मुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा, सोनई परिसरात वाळूला सोन्याचे दिवस.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सोनई परिसर, मुळा नदी पात्रातून खुलेआम वाळू उपसा व वाळू वाहतूक चालू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महसूल व पोलीस यंत्रणा वाळू विषयावर जाणिवपूर्वक सुस्त पडली की काय? असा सवाल विचारला जात आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनई पासून २० कि.मी. अंतरावर असणाऱ्या राहुरी तालुक्यात येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोहिम हाती घेऊन कारवायांचा धडाका लावल्याने वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्यांनी सोनई हे 'सुरक्षीत' क्षेत्र आपले धंद्यासाठी निवडलेले आहे. सोनई परिसरात महसूलचे व पोलिसांचे छुपे आशीर्वादाने वाळू व्यवसाय तेजीत आलेला आहे.

गाव, पेठ, वस्त्यांवर ट्रॅक्टरमधून वाळू, तर मुख्य मोठ्या रस्त्यांवर डंपरमधून दिवसा ढवळ्या वाळू वाहतूक होत आहे. हे होत असताना वाळूला सोन्याचे दिवस आलेले असून 'मुँह मांगे दाम मे' वाळू विकली जात आहे. त्यात वाळू व्यावसायिकांचे मोठे रॅकेट कार्यरत असून त्यातील काही 'महाभाग' महसूल व पोलीस यंत्रणेच्या सतत संपर्कात असल्याने व 'अर्थपूर्ण' संबंधाने कारवाईच होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.