भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही - आ. बाळासाहेब थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुरुवातीपासूनच आम्ही व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहोत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी माझ्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या छाननी अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे; पण काही दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये काहीच तथ्य नसून भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्या शेजारचेच लोक अफवा पसरवत असल्याचा आरोप माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 


   ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर                                                क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संगमनेर शहरातील एका मंडळातील गणरायाच्या आरतीसाठी माजी महसूलमंत्री आ. थोरात आले होते. त्यांच्या समवेत जि. प. सदस्य आर. एम. कातोरे, सिताराम राऊत, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.

आ.थोरात म्हणाले की, गुजरातची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यावरच देशाच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ही निवडणूक अतिशय गांभिर्याने घेतली आहे. पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. 

राज्याच्या राजकारणातील अनेक निवडणूका मी अत्यंत जवळून पाहिल्या आहेत. सध्या शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर जीएसटीचा फटकाही अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यातच या सरकारने दिलेली आश्वासनेही पूर्ण केली नाही. 

त्यामुळे सरकारबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून या नाराजीचा फायदा आगामी गुजरात विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला होणार असल्याचा दावा आ.थोरात यांनी केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.