राज्यातील दंतवैद्यकियांना अद्यावत उपचार पध्दतीचे धडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी येथे इंडियन डेंटल असोसिएशन अहमदनगर शाखेच्या वतीने नुकतेच झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील डॉक्टरांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय ख्यातीच्या दंतवैद्यकियांना यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करुन अद्यावत उपचार पध्दतीची माहिती दिली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.विश्‍वास पुराणिक, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.विकास पाटील, सीडीइ चे अध्यक्ष डॉ.सचिन कोचर, डॉ.मोईज खाकियानी, डॉ.विजय देशमुख, डॉ.राजेश जंबुरे, डॉ.विवेक हेगडे, डॉ.सुवर्णा नेने आदि उपस्थित होते.

पाहुण्यांचे स्वागत अहमदनगर शाखेच्या अध्यक्षा डॉ.प्राची पाटील यांनी केले. डॉ.पाटील म्हणाल्या की, दंत उपचार पध्दती झपाट्याने बदलत आहे. अद्यावत जागतिक दर्जाच्या उपचार पध्दती अवगत होण्यासाठी व दंत वैद्यकियांना एक व्यासपिठ निर्माण करुन, त्यांचे संघटन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील दंतवैद्यकियांना जागतिक दर्जाची सेवा देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.विकास पाटील यांनी अहमदनगर सारख्या लहान शाखेने एवढी मोठी कार्यशाळा घेवून ग्रामीण भागातील दंतवैद्यकियांना आधुनिक उपचार पध्दती अवगत करुन देण्याचे कार्य केले असल्याचे सांगून, शिस्त व नियोजनबध्द घेतलेल्या कार्यशाळेचे कौतुक केले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.विश्‍वास पुराणिक यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन याचा लाभ सर्वसामान्यां पर्यंन्त पोहचविण्याचे सांगितले. तसेच विविध शिबीराच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत तपासणी व उपचार शिबीर घेण्याचे आवाहन केले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सेवाभावाने कार्य केल्यास काही कमी पडत नाही. इंडियन डेंटल असोसिशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम चालू असून, त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी व उपचार शिबीर घेण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.हुजेफा बोहरी व डॉ.स्वाती चंगेडिया यांनी केले. डॉ.स्वरुप मगर यांनी आभार मानले. दोन दिवसीय कार्यशाळेत राष्ट्रीय किर्तीच्या दंतवैद्यकियांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. 

विविध तज्ञ मंडळीचे व्याख्याणे झाली. तसेच दंत वैद्यकिय क्षेत्रासंबंधीत प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ.पंडित, डॉ.अभिजीत मिसाळ, डॉ.चंद्रकांत डुंगरवाल, डॉ.अविनाश वारे, डॉ.विनोद मोरे, डॉ.विवेक चेडे, डॉ.ओंकार कुलकर्णी, डॉ.मुस्कान तलरेजा, डॉ.किरण खांदे, डॉ.ओमकार भालसिंग, डॉ.किरण माचवे, डॉ.दुर्गाप्रसाद हिवाळे, डॉ.सौरव पंडित, डॉ.गुरुप्रसाद हंडाळ, डॉ.कृष्णा जाजू, डॉ.रोहित धुत, डॉ.निळकंठ म्हस्के, डॉ.कुणाल कोल्हे, डॉ.गव्हाणे, डॉ.मंगेश जाधव, डॉ.भाऊसाहेब लांडे, डॉ.सोनिया औटी, डॉ.मंजुषा गांधी आदिंनी परिश्रम घेतले. 

कार्यशाळेस राज्यातील दंतवैद्यकियांसह अहमदनगर, लोणी, व संगमनेर येथील दंत महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.