आम्ही बोलतो ते करून दाखवतो - जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आजपर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या आणि त्याची सरकारी ऑर्डर नाही, अशी एक तरी घोषणा दाखवा. मात्र, विरोधक कायम टीका करत असतात. राशीनसाठी दोन कोटी दिले, त्या कामांचा नवरात्रात शुभारंभ करणार आहोत, हे काय खोटे आहे.राशीनची देवी जागृत देवस्थान आहे, मी जर खोटे बोललो तर मला काही सुटी देईल का ? मात्र विरोधक खोटे बोलत असतील तर त्यांना हाच नियम लागू होईल, असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील कुरणाचीवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे नदीपात्रात ज़मा झालेल्या पाण्याचे भूमिपूजन ना. शिंदे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे युवा नेते राजेंद्र देशमुख होते. .

ना. शिंदे म्हणाले, यापूर्वी तालुक्यात काय एवढा पाऊस झाला नव्हता काय, तरीही पाण्याचे टॅँकर लागायचे. मात्र, जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या कामांमुळे यावर्षी तालुक्यात एकही टॅँकर सुरू करावा लागला नाही. गावओढ्याचे पाणी अडविण्याची एका शेतकऱ्याची क्षमता असते काय, मात्र जलयुक्त शिवारमुळे हे शक्य झाले.

पूर्वी पाऊस झाला, की पाणी वाहून जायचे आणि महिनाभरात ओढे आटून जायचे, त्यामुळे पाणी टंचाई असायची. मात्र, जलयुक्तच्या कामांमुळे आता पाणी टंचाई दूर झाली आहे. आता विकासकामे करूनही आपल्याकडे पैसे शिल्लक राहतात. त्यातून आणखी कामे सुचवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे, 

यापूर्वी अशी स्थिती कधी नव्हती. जनतेने मला मतदानरुपी आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे आता छोट्या छोट्या गावांतही कामे सुरू आहेत. प्रमुख जिल्हा मागांर्पैकी ४७७ किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच कुरणाचीवाडी रस्ता, व्यायामशाळा ही कामे विचाराधिन असून, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या वेळी राजेंद्र देशमुख म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी या कामांचे भूमिपूजन केले आणि लगेच कामही पूर्ण झाले, त्यामुळे पावसाळ्यात त्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. हे फक्त जलयुक्तच्या कामांमुळे शक्य झाले आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, भाजप तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, अल्लावुद्दीन काझी, अंगद रुपनर, राशीनचे उपसरपंच साहेबराव साळवे, सदस्य स्वप्निल मोढळे, ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे, विकास मोढळे, गोरख कमोढळे, दिलीप सौताडे, परशुराम जंजिरे, संतोष देवगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विलास नलगे, राजेंद्र सुपेकर, रुपचंद जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश सायकर व दीपक थोरात यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.