राज्यघटना मोडीत काढण्याचा भाजपचा डाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे कुचकामी ठरले आहे. भाजप व संघ विचाराचे हे सरकार वर्णवादी व वर्चस्ववादी राजकारण करीत आहे. देशाची राज्यघटना मोडीत काढण्याचा कुटील डाव या सरकारने रचला असून हा डाव संघटित होऊन हाणून पाडावा लागेल,” असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भटके विमुक्तांच्या मुक्तीदिनानिमित्त जामखेड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यव्यापी भटके विमुक्त परिषदेचा समारोप ऍड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाला; त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉ. बाबा आरगडे, प्रा. मधुकर राळेभात, कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, प्रा. सुशीला मोराळे, पन्नालाल सुराणा, निमंत्रक ऍड. डॉ. अरुण जाधव, बापू ओहळ, द्वारकाताई पवार, अनिता कांबळे, नगरसेवक अमित जाधव, बाळासाहेब काळे, अवधूत पवार, अरुण डोळस, आदी उपस्थित होते.

ऍड. आंबेडकर म्हणाले, आदिवासी, दलित व भटके विमुक्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांचेच प्रतिनिधी सत्तेत पाठवले पाहिजेत; तर त्यांना न्याय मिळेल.” यावेळी कॉ. बाबा आरगडे, कॉ. सुभाष लांडे, पन्नालाल सुराणा, द्वारकाताई पवार, मधुकर राळेभात यांची भाषणे झाली.

परिषदेचे निमंत्रक डॉ. अरुण जाधव यांनी प्रास्ताविक व भटके विमुक्तांच्या विविध मागण्यांच्या ठरावांचे वाचन केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हे ठराव संमत केले. बापू ओहळ यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष जाधव यांनी आभार मानले. या परिषदेस महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना व संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, भटके विमुक्त समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, परिषदेच्या समारोपापूर्वी सकाळी 11 वाजता जामखेड येथील गोरोबा चित्रमंदिरापासून भटके विमुक्तांनी संविधान रॅली काढली. या रॅलीत तिरंगा हाती घेतलेल्या भटके विमुक्त समाजातील महिला, मुंबई येथील यल्गार सांस्कृतिक मंचचे कलावंत सहभागी झाले होते. 

क्रांतिकारक उमाजी नाईक व तंट्या भिल्लच्या वेषातील बहुरूपी, रायरंद, वासुदेव, विविध संस्था व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली खर्डा चौक, बाजारपेठ, कोर्ट रस्ता, पोलीस स्टेशन, जयहिंद चौक व नगर रस्ता मार्गे महावीर मंगल कार्यालय या कार्यक्रमस्थळी आली.

तेथे या रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
दोन दिवसीय राज्यव्यापी परिषदेच्या यशस्वीतेसाठी महेंद्र रोकडे, नागेश जाधव, संतोष जाधव, प्रमोद काळे, शैला यादव, नगरसेवक अमित जाधव, संतोष गर्जे, विशाल पवार, संगीता मोढवे, प्रमोद काळे, काजोरी पवार, पल्लवी शेलार, संगीत पानसरे, उज्ज्वल भावळ, साधना मोरे, आजिनाथ शिंदे, मोहन शिंदे, संतोष चव्हाण, मोहन शेगर, भीमराव चौघुले, आदींनी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.