प्रवाशाच्या सावधगिरीमुळे चोरट्याला पकडले वाहक-कंडक्टरने सोडले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य परिवहन महामंडळाच्या दुपारी तीन वाजता सुटणाऱ्या श्रीरामपूर - खानापूर या बसमध्ये प्रवाशाच्या सावधगिरीमुळे एका चोरास पकडण्यात यश आले. परंतु, बसमधील वाहक-कंडक्टरच्या मदतीने खिशात हात घालणाऱ्या चोरास दरवाजा उघडून त्याची सुटका केली. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता घडल्याने बसमध्ये एकच खळबळ उडाली होती. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी तीन वाजता श्रीरामपूर आगारातून सुटलेल्या श्रीरामपूर-खानापूर या बसमध्ये नऊ गावातील विद्यार्थी, प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बसमध्ये खूपच गर्दी होऊन या गर्दीचा फायदा घेत नेहमीच सराईत गुन्हेगार महिलांचे दागिने, पर्स, खिसे, पाकिटमारी अशा घटना घडत असतात. काहींचे यामुळे मतदानकार्ड, आधार कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होत असतात.

काल मात्र या आगारातून सुटलेल्या क्र. एमएच १४ बीटी ०७१८ श्रीरामपूर-खानापूर या बसमध्ये माळवाडगाव येथील पत्रकार विठ्ठलराव आसने प्रवास करीत असताना. ते नेहमीप्रमाणे आपली कामे आटोपून गावाकडे जात असताना गाडी सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात एका अज्ञात सराईत गुन्हेगाराने त्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. अतिशय हुशारीने आसने यांनी चोरट्याला पकडले. मात्र, त्याने गाडी चालू असतानाच दरवाजातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. 

बसमध्ये गोंधळ चालू असतानाच वाहक-कंडक्टर यांनी बसचा दरवाजा उघडून त्यास पळून जाण्यास मदत केली. रिकामी कामे वाढतील, पोलीस ठाण्यामध्ये आपला नाहक वेळ जाईल या उद्देशाने त्यांनी चोरास पोलीस ठाण्यामध्ये नेण्याऐवजी पळून जाण्यास मदत केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.