पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध गावातील 477.39 किलोमीटरच्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांचा दर्जा उन्नत करून त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून शासन मान्यता दिली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून रस्त्यांची दर्जेदार कामे होणार आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांना पकके डांबरीकरणाचे रस्त्यांबाबतचा दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील रस्त्यांची स्थिती सुधारावी, यासाठी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा रस्त्यांचा दर्जा मिळाल्यामुळे निधी उपलब्ध होऊन रस्ते सुधारतील. 

यासाठी प्रा. शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्जत –जामखेड मधील 26 ठिकाणच्या एकूण 477.39 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा उन्नत करून त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिला आहे. 

या निर्णयामुळे जिल्ह्यात सध्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या 2930.44 कि.मी. या लांबीमध्ये 477.39 कि.मी. ने वाढ होऊन एकूण जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी 3407.83 कि.मी. इतकी होणार आहे.

नव्याने प्रमुख जिल्हा मार्ग घोषित केलेल्यामध्ये बनपिंपरी, तालुका हद्द निमगाव गां., घुमरी, बेलगाव, रवळगाव, कोंभळी, कौडाने, बिटके वाडी, रामा- 55 / रस्ता इजिमा- 334. (एकूण 32.290 कि.मी.), रा.मा. 54 राशीन आळसुंदे, पनबे, खातगाव, लोणी मसदपूर ते प्ररामा-8 चापडगाव (28.800),कोरेगाव, गलांडेवाडी, जळकेवाडी, निमगांव डाकू ते प्रजिमा-8 रस्ता (20.450), इजिमा-335 ते कापरेवाडी, रिपुतवाडी, कोरेगाव, बिरांगवाडी, लोणी मसदपुर ते जिल्ह्हा हद्द रस्ता (19.900), सुपा बजहरोबावाडी ते गायकरवाडी रस्ता (10.600),

प्रजिमा-136 ते धालवडी ते तळवडी, पहगणगाव भांबोरा प्रजिमा-67 ते कोरेवस्ती रस्ता (19.000), इजिमा-349 ते गोंदडी, जिटेवाडी, जडक्सळ पवारवाडी, टाकळी खांडेश्वरी, कापरेवाडी, नागलवाडी ते इजिमा- 142 ला जोडणारा मार्ग (26.800), प्रजिमा-68 ते कोरेगाव मुरकुटवाडी ते पाटेवाडी, आनंदवाडी रस्ता (13.500), प्र.रा.मा. 66ते बहिरोबावाडी, शेळकेवस्ती, गायकरवाडी ते वडगाव तानपुरा खोडवेवस्ती, जामरवाडा रा.मा.-13 रस्ता. (13.00), निमगाव गांगर्डा रामा 141 थेरगाव रायकरवाडी प्रजिमा-66 चिंचोली रमजान ते तालुका हद्द रस्ता (14.220), रा.मा. 54 राशिन, परीटवाडी, करपडी, मोहिते वस्ती ते जिल्हा हद्द रस्ता (10.100) रा.मा.-68 भांबोरा, दुधोडी,बेरडी, देउळवाडी, सिध्दटेक, पवारवस्ती, जलालपूर रस्ता (16.200), इजिमा-337 अळसुंदे, डोंबाळवाडी, म्हाळुांगी, शेगुड, लोणी मसदपूर, जळकेवाडी, पाटेवाडी,रामा-141 नवसरवाडी ते इजिमा -144 रस्ता (29.060), प्रजिमा-53 राक्षसवाडी बु. तळवडी, बारडगाव दगडी रामा -68, करमनवाडी ते प्रजिमा-53 रस्ता (18.350), प्रजिमा-66 वालवड, चांदे खु. इजिमा-349 गुरव पिंप्री, वेताळवस्ती ते इजिमा- 334,रवळगाव रस्ता (15.600), रा.मा.-8 निमगाव डाकू, पाटेवाडी, हांडाळवाडी, कापरेवाडी,कर्जत रामा-54 बगेवाडी, नांदगाव ते इजिमा- 349 पर्यंतचा रस्ता (31.120), बांगरवस्ती, मोहा ते साकत मार्ग (11.00),

इजिमा-158 पासून महारूळी, गुरेवाडी ते नान्नज,खरातवाडी रस्ता (20.700), रा.मा. 55 पासून अरणगाव, पपपरखेड, हाळगाव ते जवळा (17.200), चोंडी, आघी, जवळा ते जिल्हा हद्द (18.100), रा.मा. 55 पासून धानोरा, पिंपरखेड ते मलठण प्रजिमा 112 (14.700), रा.मा.55 पासून रतनापुर, कसडगाव, डिसलेवाडी ते फक्राबाद (10.200),रा.मा.57 पासून जामखेड, जामदारवाडी, सारोळा, खुरर्दठण, गुरेवाडी, धोंडपारगाव ते रा.मा.-56 (18.300), सातेफळ, लोणी, आनंदवाडी, बांधखडक, तेलंगशी मार्ग (10.00), चोंडी, गिरवली, कवडगाव, अरणगाव, पारेवाडी, डोणगाव (22.400), रा.मा.-56 जवळा, चोभेवाडी, बऱ्हाणपूर, जळकेवाडी, वाघा मार्ग (15.800). या रस्त्यांचा समावेश आहे. 

यापूर्वी राज्यशासनाकडून जिल्ह्याला अशा प्रकारचा निधी प्राप्त होत नव्हता. गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात या तालुक्यांमधील रस्त्यांचा समावेश प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यस्तरावरुन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थेट निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून रस्त्यांच्या स्थितीत आमूलाग्र बदल होणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.