अनैतिक संबंधात अडचण ठरलेल्या मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पत्नीचे अनैतिक संबंध समजल्यामुळे पत्नीबरोबर वाद करणाऱ्या व अनैतिक संबंधात अडचण ठरलेल्या मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस कोपरगाव जिल्हा व अतिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दुसऱ्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत हकिगत अशी की, आरोपी शुवराज उर्फ नामदेव आनंदा कुंभार्डे याने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी मयत दिलीप जेजूरकर याला फोनवरून अंतापूर ताहाराबाद रिक्षा भाडे असल्याचे सांगून त्याला तालुक्­यातील खिर्डी गणेश शिवारात गोदावरी डाव्या कालव्याच्या जवळ बोलाविले. त्याच्या डोळ्यात मिरची टाकून लाकडी दांडक्­याने डोक्­यात गंभीर दुखापत केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याला रिक्षातून नाटेगाव शिवारातील जलद कालव्यात टाकून ठार केले. त्याची रिक्षा मनमाड शहरात सोडून दिली.

आपल्या मुलाच्या खुनाबाबत मयताचे वडिलांनी कोपरगाव पोलिसात युवराज कुंभार्डे व सून लता दिलीप जेजुरकर यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात भ.दं.वी. कलम ३०२, २०१सह ३४ प्रमाणे १५ फेब्रुवारी २०१५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी करून आरोपीविरूद्ध कोपरगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शरद मारूती गुजर यांनी १७ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, मयताचे मुलीचे जबाब, स्पॉट पंच, जप्ती पंच, शवविच्छेदन अहवाल, पोलीस निरीक्षक यांचे जबाब नोंदविण्यात आले. 

सरकारी वकील यांनी आपल्या युक्तीवादात सर्व मुद्दे सिद्ध केले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.वाय.ए.के. शेख यांनी आरोपी युवराज उर्फ नामदेव आनंदा कुंभार्डे यास भा.दं.वी. कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व सात हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच भा.दं.वी. कलम २०१ अन्वये दोषी धरून तीन वर्षे शिक्षा व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच लता दिलीप जेजुरकर हिची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.