ब्लॉग - अापण जागे झालोच पाहिजे, नाहीतर अापण माणसं नाहीत....


काल नगर तालुक्यातील निंबोडी जिल्हा परिषद शाळेतील दुर्घटनेत तीन मुलाना आपला जीव गमवावा लागला तर अनेक मुले जखमी आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक जण या आपले मत आणि निषेध सोशल मिडीया वर व्यक्त करत आहेत, शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी सोशल मिडीया वर या बाबत एक पोस्ट लिहीत व्यवस्थेबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे वाचां सविस्तर पोस्ट त्यांच्या शब्दांत.     

२८/८/२०१७ निंबोडी येथे जिल्हा परिषद शाळेतील पाचवीच्या वर्गतील मुलांच्या अंगावर शाळेचे छत कोसळल्यानंतर मला जि.प सदस्य संदेशजी कार्ले यांचा सायं ४:५२ ला फोन अाला ,चिंतातुर अावाजात ,"मी बाहेर गावी अाहे, अर्जेंट निंबोडीला जा ,जि.प शाळा कोसळली अाहे ."पाठोपाठ वडिलांचाही (गाडे सर) फोन अाला. जि.प सदस्य शरदचजी झोडगे व मि लगेच नगर यश पॅलेस वरून निंबोडीला गेलो .

सांय ५:१५ ला निंबोडी ला पोचताच कोसळलेली शाळा,चिंतातुर झालेले नागरीक,घाबरलेली मुले /गावकरी ,जेसीबी शोदमोहीम पाहुन जीव भांड्यात पडला . गावकरी,तरून मुलं,पुलिस ,जी.प सदस्य झोडगे,ब.हराळ ,सरपंच ,पोलिस अधीक्षक रंजनकुमैारजी शर्मा जेसीबी ,महिलाही ,मुलांना बाहेर काढून ,उपचारासाठी शहरातील रूग्णालयांत रिक्षाने पाठवत होते.

शाळा का कोसळली ? हे बांधकाम कोणत्या ठेकेदारने केले ? कोणत्या अधिकार्याने  शाळा वापराचा परवाना दिला?केवल निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यानेच इमारत कोसळली आहे.काही दिवसांपूर्वीच जि.प सदस्य संदेश कार्ले यांनी शाळेला भेत दिली होती,त्यावेळी शाळाखोली धोकादायक अाहे ,अशी तक्रार एकाही शिक्षकांनी केली नव्हती. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का ?

हे सर्व प्रश्न घटना घडल्यावरच उपस्थित होतात .माझा महत्वाचा प्रश्न हा अाहे कि अापल्या नगर जिल्ह्यात अापत्ती व्यवस्थापन कुचकामी अाहे . मी पाचगणीत शाळेत अस्ताना ,पहिली-दुसरी वर्गात म्हणजे मी ७ वयाचा असताना काही दूर्दैवी धटना घडली, तर काय नियोजन केले पहिजे, मौक ड्रिलच्या माध्यामातुन अाम्हा मुलांना,शिक्षकांना, व कर्मचार्यांना परिक्षण दिले जायचे.आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलांना व शिक्षकांना दुर्देवी घटना घडल्यास अापत्ती व्यवस्थापनाचे नियोजन शिकवलेच पाहिजे.

जर निंबोडी येथील मुलांना अापत्ती व्यवस्थापन नियोजनाची माहिती असती तर , कदाचीत हे चुमुकले मुले वाचली असती व जखमींची संख्या हि कमी असती .रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नव्हती,पालकांनी रिक्षतून मुलांना उपचाराठी अाणले, किती मुलांना बाहेर काढले व किती मुलांना दवाखान्यात पाठविले, याचा अंदाज येत नव्हता .

जिल्हाधिकारी कार्यालयात अापत्ती व्यवस्थापन कक्ष असून ,फारशी मदत झाली नाही .अपघाताच्या घटनेमुळे अाधीच भेदरलेली मुले रूग्णालयात गर्दी वाढल्याने अाणखी घाबरले होते, दूर्दैवी धटना घडल्यानंतर अशी गर्दी करने देखील योग्य नाही कारण जखमी मुल घाबरतात व डाॅ.ना देखील उपचार करण्यस त्रास होतो. . कालच्या या दु्र्देवी घटनांमुळे अापण जागे झालोच पाहिजे नाहीतर अापण माणसं नाहीत.

(नगरसेवक योगीराज गाडे यांच्या फेसबुक अकाऊंट वरून साभार)

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.