निळवंडेच्या कामात योगदान नसणार्‍या विखेंचे आरोप म्हणजे दुष्काळ ग्रस्तांची चेष्ठा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनेक अडचणींवर मात करुन आमदार बाळासाहेब थोरात यांनीच धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी तेच आग्रही आहेत.यांचा निळवंडेच्या कामात कोणतेही योगदान नाही अशांनी साई संस्थांनकडून 500 कोटींच्या घोषणेच्या वेळी फक्त खोटे श्रेय मिळविणे व प्रसिध्दीसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो घेतलेल्या विरोधी पक्ष नेत्यांना 1 रुपया ही मिळविता आला नसून ते स्व:तचे अपयश झाकण्यासाठी चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल करत निळवंडेच्या कामात कोणतेही योगदान नसणार्‍या विखेंचे बालीश आरोपातून दुष्काळ ग्रस्तांची चेष्ठा केली असल्याची टिका नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली आहे.


निळवंडे कालवे निधीबाबत प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात आमदार डॉ.तांबे म्हणाले कि, आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण केले.याकामी माजीमंत्री मधुकरराव पिचड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यांनी या कामात कोणतेही योगदान दिले नाही,मदत केली नाही ते फक्त दिशाभूल करण्याच्या बातम्या देत आहे. वस्तुस्थितीमध्ये या कालव्यांच्या कामांसाठी आ. बाळासाहेब थोरातांचा मोठा पाठपुरावा राहिला आहे.

अनेक भागांत कालव्यांची कामे झाली आहे.परंतू मागील 3 वर्षात या कामांसाठी सध्याच्या सरकारकडून निधी मिळाला नाही. इतर सर्वच पक्षांनी व नेत्यांनी याबाबत फक्त फोटो व बातम्या दिल्या. परंतू प्रत्यक्षात 1 रुपया ही निधी मिळविला नाही.यामुळे निळवंडे धरणाचे जनक आ. बाळासाहेब थोरात व माजीमंत्री मधुकरराव पिचड सरकार विरुध्द रस्त्यावर उतरले म्हणून सरकार झुकले व साई संस्थान मार्फत 500 कोटी देण्याची घोषणा केली.

हे पैसे साई भक्तांचे आहेत मात्र शासनाने यामध्ये काहीही निधी दिला नाही. साई संस्थानच्या पैशाच्या घोषना केली त्यावेळी विरोधी पक्षनेते फोटोसाठी सर्वात पुढे होते. मात्र आजून एक रुपया ही निधी मिळाला नाही. हे अपयश लपविण्यासाठी विखे आ. बाळासाहेब थोरात यांचेवर व दुष्काळी जनतेवर चुकीचे आरोप करुन प्रसिध्दी मिळवत आहे. खरे तर विखेंचे निळवंडेसाठी किंवा कालव्यांसाठी काय योगदान ? हा मोठा प्रश्‍न आहे.

कालव्यांसाठी लाभ क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत एकमुखी ठराव घेवून जास्तीत जास्त निधी मिळावा व त्वरीत कालवे पुर्ण करावे अशी एकमुखी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सर्व ग्रामपंचायतींचे विनंती पत्रे व ठराव शासनाकडे आहे.परंतू निधी देवू नका अशी मागणी दुष्काळग्रस्त करतील तरी कसे? विखेंनी चुकीचे विधान करुन दुष्काळी जनतेच्या मोठी चेष्ठा केली आहे .

खरं तर त्यांनी चांगली माहिती घ्यावी.सरकार निधी देत नाही म्हणून आवाज उठवावा परंतू सरकारशी मिली भगत करुन आपल्याच पक्षातील निष्ठावान नेतृत्व आ. थोरातांवर खोटे आरोप करुन ते प्रसिध्दी मिळवितात. निधी बाबत विखे सरकारला का धारेवर धरत नाहीत ? का एक रुपया ही निधी मिळवत नाहीत? निळवंडे कालव्यांच्या विरुध्द कोण आहे हे जनतेला चांगलेच माहित आहे. सर्व ग्रामपंचायती व दुष्काळी जनता यांच्यासह आमदार बाळासाहेब थोरात यांचेवरील असे आरोप म्हणजे हस्यास्पद असल्याचे आ.डॉ.तांबे यांनी म्हणले आहे.

थोरात कारखान्याची यंत्रणा कधीही चुकीचे काम करत नाही - अ‍ॅड. कानवडे
निळवंडे कालव्यांना निधी मिळू नये यासाठी दुष्काळी भागातील ग्रामपंचायती ठराव करतात. हे विरोधी पक्षनेत्यांचे विधान बालीशपणाचे असून आ. बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासह काही भागात कालव्यांची कामे व मोठ मोठ्या बोगद्यांची कामे पुर्ण केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या उच्च मुल्यांवर काम करत असलेल्या कारखान्याची यंत्रणा कायम रचनात्मक व विकासाची कामे करत असून कधी ही चुकीचे काम करत नाही. हा लौकीक महाराष्ट्राला माहित आहे. हे ही विरोधी पक्ष नेत्यांनी लक्षात घ्यावे असा टोला लगावला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.