प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ८०४ सदनिका बांधणार : महापौर सौ. कदम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहर हद्दीतील केडगाव व काटवन खंडोबा परिसरात परवडणारी घरे ८०४ घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ. सुरेखा कदम यांनी दिली. घरकुल योजना मार्गी लावण्यासाठी महापौर सौ. सुरेखाताई कदम यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत आयोज़ित बैठकीत त्या बोलत होत्या. 


या वेळी स्थायी समिती सभापती सौ. सुवर्णाताई जाधव, विरोधीपक्षनेते बाळासाहेब बोराटे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण, नगरसेवक मुदस्सर शेख, दिगंबर ढवण, यंत्र अभियंता परिमल निकम, प्रकल्प अभियंता आर.जी. मेहेत्रे, पाणीपुरवठा विभागाचे एम.डी.काकडे, गणेश गाडळकर, सहाय्यक नगररचनाकार के.वाय. बल्लाळ, आस्थापना प्रमुख लहारे, किशोर कानडे आदी उपस्थित होते. 

या वेळी महापौर सौ. सुरेखाताई कदम यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्रमांक ३ अंतर्गत अहमदनगर शहरातील केडगाव सर्व्हे क्र. २०६-१ अ या ठिकाणी ६१२ सदनिका बांधण्याचा प्रस्ताव तसेच अहमदनगर शहरातील नालेगाव सर्व्हे क्र. ४१-१ व ४३ - ३ या ठिकाणी १९२ सदनिका बांधण्याच्या प्रस्तावास नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, नाशिक यांनी शिफारस दिलेली आहे. 

परंतु सदर योजनेसाठी डी.पी. आरक्षणाबाबत नगररचनाकार यांनी सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा. व सदरचे नकाशे सहा. संचालक नगररचना विभागाकडून प्रमाणित करून घेण्यात यावेत. पाणीपुरवठा विभागप्रमुख यांनी सदर दोन्ही ठिकाणच्या योजनेच्या ठिकाणी जलवाहिनी, ड्रेनेज लाईन टाकणे, पाण्याची टाकी आदी माहिती सादर करावी. 

या महत्वाकांक्षी योजनेसाठी अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी तांत्रिक कक्ष स्थापन करणे, आस्थापना विभाग प्रमुख यांनी संबंधित योजनेसाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी , अधिकारी यांची सदरची पदे भरण्यात यावी. सदरची योजना तत्काळ मार्गी लावण्यासाठी मुख्य अभियंता २, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई -५१ यांच्या समवेत तसेच मिशन डायरेक्टर यांच्या कार्यालयाकडे अधिकाऱ्यांनी त्रुटीची पूर्तता करून काम हाती घ्यावे, असे त्या म्हणाल्या.

या वेळी स्थायी समितीच्या सभापती सौ. सुवर्णाताई जाधव यांनी सांगितले की, वरील दोन्ही योजनांच्या ठिकाणी विद्युतीकरण करण्यासाठी डीपी उभारणे, इले. पोल उभारणे, ्ट्रिरट लाईट लावणे आदी कामांचे प्रस्ताव वरील योजनेमध्ये समाविष्ट करून सदर योजनेचा डीपीआर करण्यात यावा. 

या वेळी विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे म्हणाले, सदरची योजना शहरातील व उपनगरातील सर्वसामान्यांसाठी महत्वाची घरकुल योजना असून, त्यांना मनपाच्या माध्यमातून स्वत:चे ३३० स्क्वे.फुटाचे वन बीएचके घरकुल मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडून अडीच लाख रु. अनुदान मिळणार आहे. योजनेचे काम लवकरात लवकर सुरू झाल्यास सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. याबाबत मनपा सर्वसामान्य वंचितांना न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.