ओ.बी.सी विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधील कपात तात्काळ रद्द करण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ओ.बी.सी विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधील रकमेत झालेली कपात रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार महेंद्र माळी यांना श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस व सावता परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले. 


निवेदनात असे म्हटले आहे कि, ओ.बी.सी प्रवर्गातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्तीच्या रकमेत मागील दोन वर्षात केंद्र सरकारने मोठी कपात केली आहे. सन २०१४-१५ पर्यंत मिळणारी ५५९ कोटी रूपये शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक वर्षी कपात करत सन २०१७-१८ मध्ये केवळ ५४ कोटी रूपये तरतुद करण्यात आली आहे. 

वास्तविक पाहता महागाई निर्देषानुसार शिष्यवृत्ती रकमेत वाढ होणे अभिप्रित आहे. परंतु रकमेत वाढ करणे तर सोडाच उलटपक्षी कपात झालेली आहे. ही बाब समुळ ओ.बी.सी प्रवर्गाच्या दृष्टीने अत्यंत घातक चिंताजनक नुकसानकारक व अन्यायकारक ठरणारी आहे. तसेच ओ.बी.सी समाजात जनक्षोभ निर्माण करणारी आहे.

तरी या संदर्भात गांर्भियाने विचार करून ओ.बी.सी प्रवर्गासाठी दिली जाणारी सन२०१४-१५ प्रमाणे शिष्यवृत्ती रक्कम पुर्ववत देउन पुढील काळात महागाई निर्देषकानुसार रकमेत वाढ करण्यात यावी व सामाजिक न्यायाच्या तत्वाचे राज्य सरकारकडुन अनुपालन व्हावे.

यावेळी सावता हिरवे (सावता परिषद जिल्हा कार्याध्यक्ष अहमदनगर), विजय शेंडे (सरपंच शेडगाव), विशालकाका लगड (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी वि.कॉं), विजय खेतमाळीस (ता.उपाध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस), गोरख आळेकर, सोपान डाके, पंकज बनसोडे, बाळासाहेब खेतमाळीस, रमेश शिंदे,अक्षय ससाणे, किरण शिंदे, संभाजी बेल्हेकर, सुरेश डाके, संतोष कोथिंबिरे, आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.