पोलीस हवलदार अंकुश ढवळे यांची कामगीरी कौतुकास्पद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जतच्या पोलीस उपअधीक्षक दरोडा पथकातील हवलदार अंकुश राजाराम ढवळे ( मौजे हिरडगाव ता. श्रीगोंदा ) यांनी अहमदनगर, सोलापूर, पुणे,सातारा या जिल्ह्यातील वेगवेगळ्या दरोड्यातील आरोपी पकडण्यासाठी पोलिसांच्या दरोडा पथकात कौतुकास्पद कामगीरी केल्याबद्दल सोलापूरच्या व पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना प्रशंसापत्रे देऊन गौरविलेले आहे. 


श्रीगोंदे तालुक्यातील पेडगावच्या दरोड्यात सुशीलाबाई धगाटे यांचा खून करणा-या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी नेमलेल्या दरोडा पथकातही अंकुश ढवळे व त्यांच्या सहका-यांनी चांगली कामगीरी केली. या पथकाने आरोपी पकडण्यात यश मिळविले आहे.

करमाळा तालुक्यात पोथरे, विट आणि कंदर येथील चार आरोपी पकडण्यासाठी अंकुश ढवळे यांनी मोलाची मदत केल्यामुळे सोलापूरचे पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी प्रशंसापत्र देऊज कर्जतचे पोलीस उपअधीक्षक मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला होता. कामठी ता. मोहोळ येथील दरोड्यातील दोन आरोपी पकडून देण्यातही ढवळे यांचा सिंहाचा वाटा होता. सातारा जिल्ह्यातील कराड येथे २ किलो सोन्यावर डल्ला मारून पळून गेलेला आरोपी कर्जत तालुक्यातील मारुती पिटेकर यालाही ढवळे यांनीच पकडून दिले.

पुणे जिल्ह्यातील धामणे ता. मावळ येथे दरोडा टाकून तिघांचे खून करणारे पांच संशयित आरोपी पकडण्यासाठी पुणे स्थानिक गुन्हे शाखेने अंकुश ढवळे यांची मदत घेऊन ६ मे २०१७ रोजी मोहरवाडी ( कोळगाव ) येथे १४ तास सापळा लावून दोन आरोपी पकडले.म्हणून पुणे ग्रामीणच्या प्रभारी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अंकुश ढवळे यांना १४ जुलै २०१७ रोजी प्रशंसापत्र दिले. शिक्रापूर येथील दरोड्यातील आरोपी पोपट भोसले ( फ्क्राबाद, जामखेड ) याला पकडून देण्यात ढवळे यशस्वी ठरले.

पाथर्डी आणि जामखेडचे तुरुंग फोडून पळालेले आरोपी रमेश भोसले आणि हकीम भोसले यांना अनुक्रमे आढळगाव आणि घुमरी येथे पकडले. त्या पथकातही ढवळे आघाडीवर होते. कोंडेगव्हाण ( ता. श्रीगोंदा) येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये पडलेल्या दरोड्यातील २ आरोपी ८ मार्च २०१७ रोजी पो.नि.सचिन वांगडे यांच्या पथकांनी पकडले, त्यातही ढवळेची कामगीरी महत्वाची होती. शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील चौघांचा खून करणारे आरोपी उमेश भोसले व अल्ताफ भोसले यांना बाभुळखेडा शिवारात पो.नि. दिलीप पवार यांच्या पथकाने पकडले , त्या पथकातही ढवळे आघाडीवर होते.

नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व घन:शाम पाटील, पोलीस उपाधीक्षक अभिजित शिवथरे व सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार व बाजीराव पोवार अनेक पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व दरोडा पथकातील सर्व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने अंकुश ढवळे यांनी केलेली कामगीरी निश्चितच कौयुकास्पद आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.