आ.जगतापांच्या कार्यालयात शेतकरी कर्ज माफीचे फॉर्म ऑनलाईन भरुन देण्याचा शुभारंभ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार राहूल जगताप यांच्या श्रीगोंदा येथील संपर्क कार्यालयात शेतकरी कर्ज माफीचे फॉर्म ऑनलाईन मोफत भरुन देण्याचा शुभारंभ कुकडीचे संस्थापक संचालक सुभाष डांगे आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ‍ हरिदास शिर्के यांच्या हस्ते तसेच तालुका उपनिबंधक श्री. खेडकर व तालुका कृषि अधिकारी श्री. दारकुंडे व्ही. यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आला.राज्य शासनाने कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरुन दयावे लागणार आहेत. ग्रामीण भागात तांत्रिक ‍ सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे अवघड जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वथता निर्माण झाली आहे.

कर्जमाफीस पात्र आहेत परंतु ऑनलाईन अर्ज भरला नाहीत तर शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळणार नाही अशी भिती निर्माण झालेली आहे. या सर्व अडचणीं शेतकऱ्यांनी आमदारसाहेबांच्या कानावर घातल्या असता त्यावर आमदार राहुल जगताप यांनी या अडचणींवर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्रीगोंदा येथील संपर्क कार्यालयात कर्ज माफी च्या ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुविधेचा शुभारंभ करण्यात आले.

सदर फॉर्मसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे –

पती-पत्नी चे आधारकार्ड , पॅनकार्ड असेल तर, पेन्शनरसाठी पीपीओ नंबर, कर्ज व बचत खात्याची संपुर्ण माहिती सोबत लागणार आहे. शेतकऱ्यांनी ही सर्व कागदपत्रे घेवून कार्यालयात संपर्क करावा तसेच अधिक ‍ माहितीसाठी संपर्क कार्यालय, श्रीगोंदा फोन नं- 0247-220666 यावर संपर्क साधावा.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.