२२ रस्त्यांच्या कामासाठी साडे आठ कोटींचा निधी : आ.राहुल जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मी आमदार होण्या अगोदर तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न अत्यंत बिकट होता. मी आमदार झाल्यापासून रस्त्यांना प्राधान्य देवून चांगले व दर्जेदार रस्ते करत आहोत. त्यातील एक भाग म्हणून आधी नगर-दौंड रस्ता चांगला केला. तालुक्यातून सर्वच भागातून जाणारे रस्ते दुरुस्तीसाठी अनेक गावांतील सरपंच, चेअरमन व ग्रामस्थ मला सांगत असतात. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनकडून तालुक्यातील २२ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ८३ लाख रुपये मंजूर करुन घेतले आहेत. 


या कामासाठी मुख्य अभियंता सां.बा.विभाग नाशिक यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. लवकरात लवकर ही कामे करुन तालुक्याला खड्डेमुक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. असे आमदार राहुल जगताप म्हणाले. तालुक्यातील जनता हेच माझे दैवत आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करुन देणे हे माझे काम आहे व ते मी निरंतर करतच राहणार आहे. 

तालुक्यातील मंजूर रस्ते : 

अहमदनगर दौंड रस्ता नगर / श्रीगोंदा १५ लाख रूपये. राष्ट्रीय महामार्ग : अहमदनगर दौंड रस्ता श्रीगोंदा ३५ लाख रूपये. वडगाव चाकण शिक्रापूर न्हावरा इनमगाव श्रीगोंदा जामखेड बीड रस्ता रामा ५५ ,श्रीगोंदा ६० लाख रूपये. राहाता लोहारे मांडवे पारनेर श्रीगोंदा कुळधरण कर्जत करमाळा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६७ : १ कोटी, एमडीआर , राष्ट्रीय महामार्ग ६० ते अरणगाव, वाळकी, देऊळगांव सिद्धी, राळेगण, रुईखेल, बांगर्डा, मांडवगण, खांडवी, भोसे, कुळधरण, बारडगांव रस्ता ८९ लाख रूपये. केडगाव, सारोळा, घोसपुरी, चिखली, गुंडेगाव, वडघुल रस्ता प्रजिमा ५४ ता.नगर ९ लाख रूपये. राष्ट्रीय महामार्ग ६० काष्टी श्रीगोंदा देऊळगाव मांडवगण रस्ता प्रजिमा ६३, ता.श्रीगोंदा २२ लाख रूपये. कोरेगाव, देऊळगाव, मांडवगण रस्ता प्रजिमा ८२ , ता.नगर ३३ लाख रूपये. वाकोडी, बाबुर्डी घुमट ,वाळकी वडगाव तांदळी रस्ता प्रजिमा ८१, ता.नगर २३ लाख रूपये.पारनेर, बाबुर्डी, विसापूर, पिंपळगाव पिसा, एरंडोली रस्ता प्रजिमा ५५,श्रीगोंदा ५०लाख रूपये. राष्ट्रीय महामार्ग : ५० अरणगाव, वाळकी, देऊळगाव सिद्धी, राळेगण, मांडवगण, रुईखेल, बांगर्डा, खांडवी, भोसे, कुळधरण, बारडगाव सुद्रिक ते राष्ट्रीय महामार्ग ५४ रस्ता, २५ लाख रूपये. प्ररामा ५ ते हिंगणी, दुमाला,राजापूर माठ म्हसे, चिंभळे रस्ता प्रजिमा,ता.श्रीगोंदा ६५ लाख रूपये.राष्ट्रीय महामार्ग ६० ते काष्टी, श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगण रस्ता प्रजिमा ६३, ता.श्रीगोंदा ४०लाख रूपये. उक्कडगाव ते येळपणे चिंभळे मढेवडगाव श्रीगोंदा स्टेशन लिंपणगाव अजनुज रस्ता प्रजिमा ५९ ,ता.श्रीगोंदा ७५ लाख रूपये. येळपणे, लोणी व्यंकनाथ, पारगाव, बेलवंडी कोठार ते देऊळगाव रस्ता प्रजिमा ६०,ता.श्रीगोंदा ४५ लाख रूपये.राष्ट्रीय महामार्ग ६० ते कोळगाव, सुरोडी, वडाळी, सुरोडी, श्रीगोंदा, पेडगांव रस्ता प्रजिमा ६२ श्रीगोंदा ४५ लाख रूपये. राष्ट्रीय महामार्ग ६० ते काष्टी, खरातवाडी, आनंदवाडी, पेडगांव रस्ता प्रजिमा ६४ ता.श्रीगोंदा २३ लाख रूपये.राष्ट्रीय महामार्ग ५५ ते आढळगाव फाटा, चांडगाव, शेडगाव रस्ता प्रजिमा ६५ श्रीगोंदा ३०लाख रूपये. राजापूर, मेंगलवाडी, ढवळगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, पिंपळगाव पिसा ,घारगांव रस्ता प्रजिमा ५७ ता.श्रीगोंदा ३८ लाख रूपये.केडगाव, सारोळा, घोसपुरी, चिखली, गुंडेगाव, वडघुल रस्ता प्रजिमा ५४ ता.नगर २२ लाख रूपये. राष्ट्रीय महामार्ग ६० ते कोथुळ, ढोरजा, भानगाव, देऊळगाव रस्ता प्रजिमा ६१ श्रीगोंदा २१ लाख रूपये. तालुका हद्द ते विसापूर, पिंपळगाव पिसा, एरंडोली, उक्कडगाव रस्ता प्रजिमा ५५ ता.श्रीगोंदा १८ लाख रूपये.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.