शिर्डीत हॉटेल्स व लॉजची तपासणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये संशयित गुन्हेगार पकडण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी मोहिम हाती घेतली. उपविभागीय अधिकारी सागर पाटील, पो.नि.प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० अधिकारी व २४ कर्मचाऱ्यांनी मिळून शुक्रवारी रात्री १ ते पहाटे ४ पयंर्त ही कारवाई केली. या कारवाईत ३६ वाहनांसह ५६ हॉटेल्स व लॉजची तपासणी करण्यात आली.

या कारवाईबद्दल माहिती देताना पो.नि.प्रताप इंगळे म्हणाले, शिर्डी हे धार्मिक देवस्थान असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावरून लोक ये-जा करत असतात. काही लोक व्यवसायाच्या निमित्ताने ही वास्तव्यास आहेत. त्यामुळे संशयित गुन्हेगार शोध मोहीम अंतर्गत ज्या परिसरात गुन्हेगार मिळून येऊ शकतात अथवा त्यांचे वास्तव्य आहे अशा ठिकाणी ही मोहीम राबवली गेली.

त्यात १६ संशयित पोलिसांना मिळून आले आहे. रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांचीही तपासणी करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली येणारे सण, उत्सव गणेशोत्सव या प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या मोहीम राबवण्यात येतात असे सांगितले. या पुढच्या काळात ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.