शेवगाव हत्याकांडातील मुख्य आरोपीस अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगावमधील हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांड व दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार परसिंग हरसिंग भोसले, (वय २९, रा.बाभुळखेडा.ता.नेवासा) याला स्थानिक पोलिसांनी कर्जत तालुक्यातील अखोणी येथून शनिवार दि.१२ रोजी पाठलाग करून मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. 


त्याने या हत्याकांडासह इतर ४ जिल्ह्यांत अनेक गुन्हे केले आहेत. नगरसह नाशिक पोलिसांनाही वॉटेंड होता.भोसलेकडून आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. .

याबाबत सविस्तर असे की, शेवगावमधील एकाच कुटुंबातील चार सदस्यांची निघृर्णपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.