आ.मुरकुटे यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भेंड्याच्या ज्ञानेश्वर कारखानाच्या सर्वसाधारण सभेत आ. बाळासाहेब मुरकुटे मुरकुटे यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांच्या अडचणीला वाऱ्यावर सोडत मुळ प्रश्नाला बगल देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जोपर्यंत या दोघांची 'सेटलमेंट' आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर कारखानाच्या पुढील सर्वसाधारण सभेत मी स्वत: जाऊन प्रशासनाला जाब विचारणार आहे, असे माजी आ. शंकरराव गडाख यांनी नेवासा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी गडाख म्हणाले की, भेंडा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कारखाना अडचणीतून जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी पेठ तसेच सर्वसामान्य माणूस यांच्यात मोठा फरक पडत आहे. भेंडा येथील सर्वसाधारण सभेत मोठ्या ऐटीत आ. मुरकुटे गेले; परंतु उसाला भाव, कोट्यवधींचे कर्ज यांसारख्या महत्वांच्या प्रश्नाला बगल देत त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.

शेतकऱ्यांचा कळवळा आहे, असे भासविण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्वसाधारण सभेला गेले; परंतु त्यांची मुगगीळू भूमिका उपस्थितांच्या ध्यानात आली. कारखान्यावर डोके फोडून घेणारे मुरकुटे हे मागील ३ सभेला का गेले नाहीत ? ऊस भावाबाबत का गप्प राहिले अशी कुठली रसद भेंडा कारखान्याकडून मिळते की ज्यामुळे ते शांत झाले आहेत. जनता भोळी राहिलेली नाही. शेतकऱ्यांना माहीत आहे की आ. मुरकुटे यांना कुठली रसद मिळतेय. या जोडगोळीचा खरा चेहरा समोर आला आहे. 

मुळा कारखान्याने मागील वर्षी सुमारे ७ ते ८ कोटींची खते शेतकऱ्यांना दिली व भेंड्यापेक्षा सुमारे २०० रूपयांनी भाव मुळाने जास्त दिला. हे घुले यांना का शक्य झाले नाही ? जोपर्यंत घुले - मुरकुटे यांची राजकीय सोयीसाठी झालेली युती आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही, असेही गडाख म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.