मुलीच्या जन्माचे स्वागत फळझाडे लावून करा : सौ. विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समाजातील स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार थांबले पाहिीजेत. मुलगी जन्माला येताच तिचे स्वागत फळझाडे लावून करा. झाडाला येणाऱ्या फळांच्या उत्पन्नातून मुलीचे शिक्षण करता येईल व पर्यावरणही वाचविता येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले. दातीरवाडी (अकोला) येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात भाविकांशी सोमवारी संवाद शाधताना विखे बोलत होत्या. 


या वेळी जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, बाळकृष्ण सुडके ,जि.प. सदस्या प्रभावती ढाकणे, राहुल राजळे, मोहन पालवे, अमोल गर्जे, बंडू बोरुडे, अजय रक्ताटे, सुभाष केकाण, नारायण पालवे उपस्थित होते.

या वेळी बोलताना विखे म्हणाल्या, स्व. बाळासाहेब विखे यांचा व पाथर्डी तालुक्याचा जिव्हाळ्याचे संबध होते. विखे यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते या भागात आहेत. त्यांना बळ देण्याचे काम करू. महिलांचे आरोग्य, स्त्रीभ्रूण हत्या हे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. महिलांना राजकारणातही कामाची संधी मिळते आहे.

समाजातील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचे काम विखे कुंटुबाने गेल्या तीन पिढयांपासून केले आहे. अहमदनगरच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा परिषदेत येऊन काम सांगा, तुमच्या सेवेत राहू.

या वेळी बोलाताना रामराव महाराज ढोक म्हणाले, एकतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय हाच भक्तिपंथाची पताका घेऊन धावतो आहे. संसारात सुख नाही, भक्तितून मिळणारा आनंद चिरकाळ टिकणारा असल्याने देवाच्या भक्तीचा विसर पडू नये, यासाठी संत तुकाराम महाराजांनी देवाकडे मागितलेले दान समाजाच्या कल्याणाचे आहे. संतांची संगती ही दुर्मिळ गोष्ट असून, ती भाग्यवान भक्तालाच मिळते. देवाचे नामस्मरण सतत करणे व अंतकाळी ते होणेही परमार्थामधली अंतिम अवस्था प्राप्त होणे यालाच मोक्षप्राप्ती म्हणतात.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.