माजीमंत्री पाचपुते याना विश्रांतीची गरज - आ.राहुल जगताप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विसापूरचे आवर्तन उशिरा सुटण्यास आमदार राहुल जगताप जबाबदार असल्याचा आरोप करून, माजी मंत्री पाचपुते यांनी पाणीप्रश्नावरून आमदार जगताप यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना.विसापूर प्रकल्पातून पाणी उशिरा सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनी ते पस्तीस वर्षे सत्तेत होते. त्यावेळी कधी पाणी सोडले होते, याची आकडेवारी घ्यावी. कुकडी - घोडसह विसापूरच्या बाबतीत त्यांनी केवळ घोषणा केल्या, कृती केलीच नाही. त्यामुळे त्यांनी साठवून ठेवलेले पाप साफ करण्यातच वेळ जात आहे. आरोप करण्यापूर्वी मागे डोकावून पहा. असे पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडले.

आ. जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, विसापूरचे पाणी आमदारांमुळे उशिरा सुटले. आपण अधिकाऱ्यांना सांगितल्यानेच विसापूरची बैठक लागली.असे पाचपुते म्हणाले होते, त्यावर त्यांना खरचं विश्रांतीची गरज असल्याचा टोला मारत जगताप म्हणाले की, पस्तीस वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. त्यात मंत्री, पालकमंत्री ही महत्त्वाचे पदेही होती. घोडला नियमातील पाणीसाठा होण्यापूर्वी कधीच पाणी सुटले नाही. त्यांना नियम माहिती होता, पण शेतकऱ्यांचा खूप कळवळा आहे, हे दाखविण्यासाठी घोडचे पाणी सोडण्याचे नाटक झाले.

माझ्या कामाचे श्रेय घेताना हे त्यांनी सांगितले म्हणून झाले, असे लोकांना सांगताना आयत्या पिठावर रेघा मारण्याचे उद्योग करीत आहेत.कुकडीचे आवर्तन सुटल्यानंतर चर्चा न करता अगोदर विसापूरमध्ये पाणी वळविले, यांच्या काळात असेच कधी घडले होते का ? 

माझे वडील आजारी आहेत. त्यांना उपचारासाठी घेवून गेलो, पण त्याचेही भांडवल करण्याचा प्रयत्न झाला. कालवा सल्लागार समितीची बैठक लागण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी व प्रमुख शेतकऱ्यांशी बोललो होतो. त्यांच्यामुळेच बैठक लागली व पाणीही सुटल्याचा कांगावा ते करीत सुटले आहेत. श्रेय घ्यायचे तर घ्या पण तुम्ही सत्तेत होतात त्यावेळी शेतकऱ्यांचे भले करायला तुमचे हात कोणी धरले होते हे तरी सांगा. घोड व विसापूरची उंची वाढविण्याच्या घोषणा किती वेळा केल्या. काय झाले या उंचीचे कुणालाच समजले नाही.

विसापूर खालच्या शेतकऱ्यांची त्यांना नव्हे तर आम्हाला काळजी आहे. यापूर्वी कालवा, वितरीका दुरुस्तीच झालेली नाही. त्यावेळी किती निधी खर्च झाला याची माहिती मागवली आहे. आता आपण ही दुरुस्ती करीत आहोत. त्यामुळे इकडे तिकडे होणार आहे. मात्र त्यातही राजकारण करण्यात हे नाकर्ते नेते गुंतले आहेत.

लोकांनी तुम्हाला थांबविले आहे त्याची आठवण ठेवून थांबले पाहिजे. अशीही टीका त्यांनी केली. मी सहकाऱ्यांच्या मदतीने काम करण्यास सक्षम आहे. तुम्ही लूडबूड करुन पाण्याचा बट्याबोळ करण्याचे उद्योग बंद करा. निवडणुकीला अजून वेळ आहे.असाही टोला आ.जगताप यांनी लगावला.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.