विकासकामे बंद करण्याचा दम लोकप्रतिनिधींने देणे हे पारनेर तालुक्याचे दुर्दैव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यात जी कामे शासन आाखड्यानूसार करते त्या कामांची मंजुरी यादी प्रसिध्द होताच, तालुक्याचे आमदार अधिकारी व जनतेला वेठीस धरुन नारळ फोडण्याचा आग्रह करतात. शासनाची नित्य विकासकामे देखील मीच मंजूर करुन आणतो. अशी लोकांची दिशाभूल करतात असा आरोप वडुले गावच्या सरपंच सौ. आरती रोेकडे यांनी केला. 


त्या पुढे म्हणाल्या की, मी एक महिला सरपंच आहे, माझे गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ठ आहे, शासन प्रत्येक गावास या मोहिमेत बंधारा देतच आहे, त्याचा आमदारांशी काडीचाही संबंध नाही. मग ठेकेदार व अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मला नारळ फोडायला बोलवा, अन्यथा काम बंद करु असा दम लोकप्रतिनिधींने देणे हे पारनेर तालुक्याचे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधाऱ्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बापुसाहेब भापकर, दादासाहेब पठारे, सुरेश पठारे, उपसरपंच पंडाजी भाऊसाहेब खामकर, ग्रा.पं.मिरा शहाजी भापकर ,नंदा कुंडलिक शिंदे, शोभा बाबूराव नवले, सचिन शहाजी पठारे, संपतराव कचरु भापकर, बाळासाहेब निमोणकर, राजेंद्र चेडे, संपत आबासाहेब भापकर, गुलाबराव भापकर, भिकाजी भापकर, सदाशिव भापकर, बबन भापकर, संभाजी भापकर, विजय साळवे, संतोष सोनवणे, कचरु रोकडे, शंकर रोकडे, संजय रोकडे, बापुसाहेब गायकवाड, योगेश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, गंगाराम भापकर, राजेंद्र पठारे, शहाजी खामकर, ठेकेदार दत्ता लाळगे, ग्रामसेवक पवार भाऊसाहेब तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.