सोनगाव मध्ये कृषीदूतांकडून शेतक-यांना मार्गदर्शन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड त.संगमनेर येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी सोनगाव येथील शेतक-यांना माती परीक्षणाविषयी सखोल मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस सेंद्रिय खतांचा तुटवडा व रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर अनिष्ट परिणाम होत आहे.माती परीक्षणावरून जमिनीचा कस म्हणजेच जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते.त्यानुसार उर्वरीत अन्नद्रव्ये किती प्रमाणात खंताद्वारे द्यायला पाहिजे यांची माहिती मिळते.

जमिनीची आम्लता आणि क्षारांचे प्रमाण किती आहे ते कळते. कृषीदुतांनी यामध्ये माती परीक्षणाचे उद्देश, मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी,मातीचा प्रातिनिधिक नमुना कसा घ्यावा ,मातीचा नमुना काढण्याची पध्दत आणि मातीच्या नमुन्यासोबत पाठवण्याचे माहितीपत्रक याबद्दल शेतक-यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

कृषीदुतामध्ये गौरव ब्राम्हणे ,मोहित पवार,पंकज दरंदले.आकाश खैरनार,प्रशांत वाळे,प्रदीप महाले,राहुल साठे,यांचा समावेश होता.या उपक्रमासाठी शासकीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन प्रा.निकम सर,प्रा.इल्हे सर तसेच श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हारदे सर,प्रा.दसपुते सर,प्रा.साबळे सर,प्रा.तायडे सर,प्रा.कळसकर सर,व प्राध्यापिका घुले मॅडम व प्राध्यापिका सहाणे मॅडम व कार्यक्रम अधिकारी प्रा.माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.