'मराठा क्रांती महामूक मोर्चासाठी नगरमधून तीन लाख जण जाणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यासह देशभरातून सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीदिनी (दि.९ऑगस्ट) मुंबईमध्ये काढण्यात येणाऱ्या मराठा महामूक मोर्चात नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन लाख मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती अहमदनगर सकल मराठा समाजाच्या संयोजकांनी दिली आहे. 


मराठा समाजास आरक्षण मिळावे, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात यासह इतर मागण्यासाठी सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी जगातील सर्वात मोठा व अभूतपूर्व महामूक मोर्चा मुंबई येथे दि. ९ रोजी काढण्यात येणार आहे. 

मुंबईतील भायखळा येथील जिजाऊ उद्यानापासून या मोर्चास सुरवात होणार असून, मोर्चाचा शेवट आझाद मैदान येथे होणार आहे. संपूर्ण राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. नगर जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चाच्या जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली काढली होती. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.