भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करुन भारताच्या लोकशाहीवर घाला घालण्याचे काम करीत आहेत. लोकशाही संपवून हुकूमशाही पध्दतीने देश चालविण्याचे काम हे भाजप सरकार करीत आहे. परंतु, युवक कॉंग्रेस भाजप सरकारला पुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल असे प्रतिपादन हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नगर दक्षिण लोकसभा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लालटाकी येथे हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी शुभम नेटके, आशीष दांगडे, अनंत नाकाडे, संकेत डोळे, मुकुल देशमुख, अभिजित कुलकर्णी, सौरभ पवार, रवींद्र दरोडे, विशाल रोहोकले, दादा करड, अनिरुध्द दरेकर, राम पठारे, किरण शेळमकर, गणेश वामन, बापू चितळकर, आकाश ढाकणे, आकाश सूर्यवंशी, बाळकृष्ण आव्हाड, सागर ढगे, आकाश उपाध्ये, सूरज पवार आदी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षामध्ये भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक झाली आहे. जातीजाती मध्ये भांडणे लावण्याचे काम सुरु करुन समाजामध्ये अस्थिरता निर्माण केली गेली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.