अंनिस कधीही परदेशी किंवा शासकीय निधी घेत नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रबोधन हा आपल्या कार्याचा गाभा मानून काम करते,ही चळवळ लोक चालवितात म्हणूनच आजवर परदेशी किंवा शासकीय निधी आम्ही घेतला नसल्याचे प्रतिपादन अ. भा.अंनिसचे राज्य प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले .


अंनिसच्या संघटन विस्तारासाठी शहरात आलेले पाटील येथील कामगार युनियन सभागृहात पत्रकारांशी बोलत होते ,सध्या सनातन किंवा कथित हिंदुत्ववादी संघटना आर्थिक गैरव्यवहाराचा ज्या अंनिसवर आरोप करीत आहेत ,ती अ. भा.अंनिस नव्हे ,आमचे सगळे हिशेब आणि आर्थिक व्यवहार अतिशय चोख असून गेल्या 35 वर्षापासून देशभर लोकांच्या विश्वासावर चालणारे हे एकमेव सामाजिक संघटन असल्याचे आवारे पाटील यांनी स्पष्ट केले .

लोक प्रबोधन हे आमचे मूळ काम आहे असे आम्ही मानतो ,संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे हे काम प्रभावीपणे केले आहे ,अंनिस त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे संघटन आहे,आमचा देवा धर्माला कधीही विरोध नव्हता ,देवाच्या नावाखाली सामान्य लोकांच्या शोषणाला आम्ही मात्र विरोध करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
जादूटोणा विरोधी कायदा अतिशय क्रांतिकारी असून चमत्कार हे गुन्हा ठरवणारा अशा प्रकारचा कायदा जगात केवळ आपल्या राज्यातच झाला आहे. सगळी प्रसार माध्यमे,पत्रकार यांनाही हा कायदा तेवढाच लागू आहे, त्यामुळे पत्रकारांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 


अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.