नगरमध्ये कांदा @ ३५०० रुपये.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर बाजार समितीत गुरुवारी (दि.३) कांद्याला विक्रमी असा ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला आहे. मागील लिलावाच्या तुलनेत गुरुवारी कांद्याचे बाजारभाव दुप्पटीने वाढले असून पुढील काही महिने कांदा असाच चढ्या दराने विकला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी, दि. ३ रोजी ५० हजार कांदा गोण्यांची म्हणजेच साधारण ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याची लिलाव प्रक्रिया सुरु झाल्यानंतर लिलावाची पहिलीच बोली २८०० रुपये प्रतिक्विंटलने लागली. त्यानंतर एक नंबरचा कांदा ३३०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला. ३०० ते ४०० रुपयांपासून ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे कांद्याचे लिलाव झाले.

कांद्याच्या निर्यातीत वाढ झाली असून इतर राज्यातूनही कांद्याची मागणी वाढल्याने राज्यभरात कांद्याच्या भावात मोठी वाढ होत आहे. नगर बाजार समितीत कांद्याला मिळालेला ३५०० रुपये भाव हा यंदाचा विक्रमी भाव असल्याचे सभापती विलास शिंदे व सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.