कार्यकर्त्यांनी जनतेत राहून त्यांचे प्रश्‍न सोडविले पाहिजे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिवसेनेत युवकांचे कार्य, जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची क्षमता, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची तयारी असलेल्या कार्यकर्त्यांवरच जबाबदारी दिली जाते. त्यामुळे नागरिकांचे प्रश्‍न सोडविले जातात. यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेत राहून त्यांचे प्रश्‍न सोडविले पाहिजे. आज ज्या पदाधिकार्‍यांची निवड झाली आहे, त्यांनी आपआपल्या भागातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवावेत व मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांचे सेवा करण्यासाठी करावा, असे आवाहन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. शिवसेनेच्या उपशहरप्रमुखपदी वैभव सुरवसे व पन्नालाल लसगरे यांना नियुक्तीचे पत्रे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभागृहनेते अनिल शिंदे, नगरसेवक संजय शेंडगे, गणेश कवडे, सचिन जाधव, संभाजी कदम आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, शिवसेने नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. राजकारणापेक्षा समाजकारणालाच महत्व दिले आहे. त्यामुळे नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी जनतेचे कामे करावेत, त्यांचे प्रश्‍न सोडवावेत. मनपा संबंधी काही प्रश्‍न असल्यास त्यासाठी आपण सहकार्य करु, असे सांगितले. 

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, सध्या शिवसेनेवर युवकांचा विश्‍वास असल्याने व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेनेतच होत असल्याने शिवसेनेत युवक दाखल होत आहे. या युवा शक्तीला योग्य दिशा देऊन समाजहिताचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी युवकांनी संघटन मजबूत करावे, असे आवाहन केले. 

यावेळी नवनियुक्त उपशहरप्रमुख वैभव सुरवसे व पन्नालाल लसगरे म्हणाले, आज शिवसेनेच्यावतीने आमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे. ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. पक्षाने दिलेले आदेशाचे पालन करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास संदिप कुलकर्णी, धनेश तुपे, विशाल गायकवाड, सागर पडवळे, रोहित आहेर, जय लसगरे, अदित्य आहेर आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.