पाथर्डी तालुक्यात महिलेची कुऱ्हाडीने हत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील औरंगपुर येथील दलित समाजाच्या महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिचा खून करण्यात आला. मयत महिलेच्या मुलीच्या डोक्यातही कुऱ्हाडीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली असून पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. शांताबाई कसबे असे मयत महिलेचे नाव आहे. बुधवारी (दि.३०) पाच वाजण्याच्या सुमारास औरंगपूर गावात ही घटना घडली. या प्रकरणी चक्रधर दत्तात्रय देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

औरंगपूर येथे शांताबाई मरीबा कसबे (वय ५७) या मुलगी रंजना चांदणे हीच्या समवेत राहत होत्या. गावातील चक्रधर दत्तात्रय देशमुख याने बुधवारी दुपारनंतर पाच वाजण्याच्या सुमारास शांताबाई यांच्या घरातच त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाडीचा वार डोक्यात लागल्याने शांताबाई जागेवरच गतप्राण झाल्या.

त्यांच्या पायावरही वार करण्यात आला. यावेळी जवळच असणारी शांतबाईंची मुलगी रंजना चांदणे (वय ३२) यांच्यावरही देशमुख याने हल्ला केला. त्यांच्या डोक्यातही कुऱ्हाडीचा वार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण सहकाऱ्यांसह औरंगपुर येथे दाखल झाले. यावेळी चक्रधर देशमुख स्वत:च्या घरात जाऊन बसला होता. त्याने आतुन कडी लावुन घेतली होती. 

पोलिसांनी देशमुख याला घराची कडी उघडण्यास सांगितले असता त्याने कडी उघडताच त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी देशमुख याच्याकडुन घटनेतील कुऱ्हाड व एक लोखंडी गज ताब्यात घेतला आहे. शांताबाई यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना त्यांचा मृतदेह पाथर्डीला घेवुन जाण्यासाठी अडविले. 

शांताबाई यांचे शेवगाव येथील नातेवाईक येईपर्यंत मृतदेह हलवु नका अशी भूमिका गावातील नातेवाईकांनी घेतल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शांताबाई यांचा मृतदेह रात्री उशीरा पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.