झाले गेले विसरून जात आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हा - सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता नगरपालिका निवडणुकीत झालेगेले विसरून जा व विधान सभेच्या निवडणुकीसाठी कार्यकत्र्यांनी सज्ज व्हा असा सल्ला युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी कार्यकत्र्यांच्या बैठकीमध्ये दिला. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर प्रथमच मंगळवारी 29 ऑगष्ट रोजी राहाता शहरांमध्ये आठ महिन्यांनी युवानेते सुजय विखे यांनी राहाता येथे येऊन जलक्रांती अभियान मार्फत राबविलेल्या तलावांचे जलपुजन केले. त्यानंतर जेजूरकर वस्ती येथे आयोजित कार्यकत्र्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती दर्शविली. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

यावेळी त्यांनी कार्यकत्र्यांना सांगितले की, राहाता नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये झाले गेले विसरून येणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भरघोस मताधिक्यांनी निवडून राज्यात मागील वेळेप्रमाणे याही वेळेस सर्वात जास्त लिड देऊन विजय करावे व राहाता शहरातून चार ते पाच हजाराचे लीड द्यावे तरच मी राहातेकरांचा सत्कार स्विकारेल. 

मीही आता नाराजी विसरलो आहे. नगरपालिकेमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी व नाराज झालेल्या कार्यकत्र्यांनी संघटीत होऊन एकदिलाने पक्षासाठी काम करावे. कार्यकत्र्यांनी मला कोणाकडे जावे हे सांगू नये मी माझ्या पध्दतीने आता राहाता शहरामध्ये निवडणुकीसाठी व विकास कामासाठी आराखडा तयार केला आहे. शहरातील नागरीकांनी विविध प्रकारच्या विकास कामा संदर्भात मला समक्ष भेटावे. त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविले जातील. शेतीपाण्या विषयी आपली भुमिका नेहमीच शेतक-यां बरोबर आहे. तालुक्यातील सर्वच गावतळे व जलक्रांती अभियाना मार्फत राबविल्या गेलेल्या योजना जलसंपदा विभागा मार्फत पाणी सोडून भरलेल्या आहेत. 

पाऊस चांगला झाल्याने शेतीसाठी पाणी आता उपलब्ध आहे. तरीही शेतक-यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी प्रश्नांसाठी मी सदैव शेतक-यांच्या बरोबर आहे. मी नगरपालिका निवडणुकी नंतर राहाता शहरवासियांवर नाराज होतो. पण आपल्याच लोकांवर किती दिवस नाराज राहायचे झालेगेले विसरून आता सर्वांनी विधानसभेसाठी कामाला लागावे. असा सल्ला युवानेते सुजय विखे यांनी कार्यकत्र्यांना दिला. यावेळी कार्यकत्र्यांची संख्या मोठया प्रमाणावर होती. 

तरच मी सत्कार स्विकारेल... 
कार्यकत्र्यांच्या आयोजित बैठकीमध्ये युवानेते डॉ. सुजय विखे यांनी सत्कार स्विकारला नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये नामदार साहेबांना राहाता शहरातून भरघोस मतांचे लीड द्या तरच मी सत्कार स्विकारेल अशी भुमिका घेतली व कार्यकत्र्यांनी नगरपालिका निवडणुकीत झालेगेले विसरून संघटित होऊन निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असा सल्ला दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.