डॉ.कवडे यांचा पदम पुरस्काराने सन्मान व्हावा - आ. शिवाजी कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगरचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्यामधे नगर चे सुपुत्र डॉ.रविंद्र कवड़े यांचे नाव आघाडीवर आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाची सेवा करणारे कवडे नव्य पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. क्रीड़ा, शिक्षण, सामाजिक क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.भारतभूमीची निरलस सेवा करणाऱ्या डॉ.कवडे यांचा पदम पुरस्काराने सन्मान व्हावा असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 

स्वातंत्र्य सैनिक,आंतरराष्ट्रिय कुस्ती खेळाडू–पंच, जागतिक कुस्ती सुवर्णपदक विजेते डॉ.रविंद्र कवड़े यांच्या अमृतमहोत्सवी कृतदन्यता सोहळ्यात श्री कर्डिले बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथि म्हणून आमदार अरुणकाका जगताप,आमदार संग्राम जगताप,दादाभाऊ कळमकर,मा. महापौर अभिषेक कळमकर,बाजार समिति सभापती हरिभाऊ कर्डिले,मेहेरनाथ कलचुरी,सुभाष काकड़े,डॉ.शरद कोलते, प्रा. पांडुरंग ऋषी, सुद्रिक आदि उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते स्व.कवडे दाम्पत्याच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.डॉ.कवडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपटाचे यावेळी सादरीकरण झाले.अतिथिंचा सत्कार करण्यात आला.संगमनेर टाइम्स चे संपादक किशोर कालड़ा यांनी संपादित केलेल्या "डॉ.रविंद्र कवडे–एक दीपस्तंभ" या विशेषांकाचे अथितींच्या हस्ते प्रकाशन सम्पन्न झाले.स्वागत अभिनन्दन वाळके यांनी केले तर प्रास्ताविक नंदकुमार लोणकर यांनी केले.

अमृतमहोत्सवी कृतदन्यता सोहळ्यात डॉ.कवड़े यांना मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा,ग्रंथ, वृक्ष व भव्य पुष्पाहार प्रदान करण्यात आला.डॉ.कवडे लिखित १६ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवारांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

आमदार अरुणकाका यांनी विशद केले की,कवडे यांचे योगदान देशासाठी महत्वाचे आहे.पी.एच.डी.करणारा पहिलवान ही नगरसाठी मोठी घटना आहे.त्यांनी इतिहास घडवला आहे. 

अभिषेक कळमकर म्हणाले की आम्हा तरुणांसाठी कवडे यांनी सामाजिक दिशा देण्याचे काम केले आहे.प्रा. कोलते व प्रा. ऋषि यांनी कवडे यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगीतल्या.इतर अतिथिंनि शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ.कवडे यांनी नमूद केले की माझ्या नगरने केलेला माझा सन्मान मला उर्जादायी व प्रेरणा देणारा आहे.जन्मभूमी साठी लढण्या चे बळ मला यातून मिळणार आहे.

अनेक मान्यवरांनी यावेळी डॉ.कवडे यांचा सत्कार केला. डॉ अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय दांगट यांनी आभार मानले.यानंतर अभिष्टचिंतनाचा केक कापण्यात आला. कार्यक्रमासाठी सौ.राज कवडे,श्रीमती सुलभा वाळके,कु.स्वप्ना वाळके,देवेन्द्र कवडे,सुरेन्द्र कवडे,हर्षद मुळे, योगेन्द्र कवडे,महेंद्र कवडे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी क्रीड़ा,शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.