चिचोंडी पाटील येथे शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील शेतकरी अमृत पाराजी हजारे (वय ४३) वर्षे यांनी बुधवार, दि. २ ऑगस्ट रोजी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे आई, पत्नी, २ मुली, एक मुलगा,असा परिवार आहे. 


याबाबत पोलीस पाटील संतोष खराडे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली. अमृत हजारे यांनी सकाळी ६ च्या सुमारास घराज़वळ असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मयत हजारे यांच्याकडे विविध सहकारी सोसायटी व सेंट्रल बँकेचे कर्ज थकित आहे, अशी माहिती मयत हजारे यांचे बंधू अशोक पाराजी हजारे यांनी दिली. अमृत हजारे हे कर्ज थकित असल्यामुळे तणावात होते, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हजारे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.