काष्टीतील मोबाईल शाॅपी फोडणारा आरोपी वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बाळासाहेब कणसे यांच्या श्री साई मोबाईल शाॅपी तील मोबाईल चोरी प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी महेश रामचंद्र भालके रा कुरकुंभ ता दौड जि.पुणे याला अटक केली आहे. एक वर्षानंतर मोबाईल चोरी उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दि २७ जुलै २०१६ रोजी काष्टी वाघजाई चौकातील श्री साई मोबाईल शाॅपी आरोपी महेश भालके व झारखंड राज्यातील कुंज नावाचा आरोपी या दोघांनी मध्यरात्री पाळत ठेवून मोबाईल शाॅपी फोडली आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ७१ मोबाईल हॅण्डसेट चोरीला गेले होते ,  

या घटनेनंतर श्रीगोंदा पोलिसांना या आरोपींचा तपास लागला नव्हता, पण वरील आरोपीस नगर पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली तेव्हा त्यांनी काष्टी येथील श्री साई मोबाईल शाॅपी फोडल्या ची कबुली दिली आहे. 

त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारना केली असता आरोपीने त्याच्या जवळील काही मोबाईल हॅण्डसेट काढून दिले त्यामुळे पोलिसांना सबळ पुरावा मिळाला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.