प्राचार्य डॉ. मतकर यांच्या विरूद्धचा अॅट्रोसिटी गुन्हा मागे घ्या,अन्यथा आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव शहारातील न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढवून नॅक समितीची अ दर्जा श्रेणी प्राप्त करून देणारे, कॉपीमुक्त अभियान यशस्वी राबविणारे व मुलींना निर्भय वातावरणात शिक्षणाची संधी मिळवून देणारे प्राचार्य डाँ. लक्ष्मण श्रीधर मतकर यांना जाणिपुर्वक बळीचा बकरा बनविण्यात येत आहे. त्यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेला अँट्रासिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा व दोषींवर योग्य ती कारवाई करा, अन्यथा धनगर समाज बांधव संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू करतील, असा इशारा धनगर समाज बांधवांनी बुधवारी दिला. 


 
शहरातील न्यू आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मतकर यांच्या विरूद्ध पोलिसांत दाखल झालेल्या अॅट्रोसिटी गुन्हयांसंदर्भात तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी शेवगाव पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. रासपचे जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक निवृत्ती दातीर, कम्युनिष्ठचे बापुसाहेब राशिनकर, रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राचार्य. मतकर यांच्यामुळे महाविदयालयाला पुणे विदयापीठाचा उत्कृष्ट ग्रामीण महाविदयालायाच पुरस्कार मिळाला. तसेच महाविदयालयास नँकची अ श्रेणी मिळुन दिली. त्याच प्रमाणे एन.एस.एसचा बेस्ट युनिट पुरस्कार मिळाला. 

महाविदयालयात गुंडगिरी करणा-यांना धारा दिला नाही. म्हणून दुखावलेल्या समाजकंटकांनी फिर्यादीस हाताशी धरुन शेवगावचे वातावरण बिघडवण्याचा व जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेतील अंतर्गत गटबाजीची त्याला किनार आहे. प्राचार्य मतकर यांच्यासारखा उच्चशिक्षीत व अल्पसंख्यांक समाजातील माणूस कधीही जातीवाचक शब्द वापरु शकत नाहीत.

यावेळी बोलतांना विविध वक्त्यांनी शासनाने आमचा संयम पाहू नये. राज्यातील सरकार आमच्यामुळे आलेले आहे. या खोटया गुन्हयाची कलम १६९ अंतर्गत चौकशी करुन गुन्हयातील तथ्य तपासावे. मतकर यांना बळीचा बकरा केले जात आहे. हा गुन्हा दाखल करण्यामागे वेगळी शक्ती काम करीत असून षडयंत्र रचुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पोलीसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर आठ दिवसात संपुर्ण राज्यात आंदोलन करु असा इशारा रासपचे जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक निवृत्ती दातीर, कम्युनिष्ठचे बापुसाहेब राशिनकर, रासपचे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, पाचेगावचे सरपंच दिलीप पवार यांनी दिला.

शेवगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी निवेदन स्विकारले. मोर्चात नगरसेवक अशोक आहुजा, विकास फलके, भाऊसाहेब कोल्हे, गणेश कोरडे, अमोल मिसाळ, खादी ग्रामउदयोग संघाचे आबासाहेब मिसाळ, खरेदी विक्री संघाचे संचालक शहादेव खोसे, भाऊसाहेब डुकरे, रविंद्र घुगरे, गोरक्षनाथ कर्डीले, कारभारी वीर, गोपीनाथ चोरमारे, गोरक्षनाथ कर्डीले, लक्ष्मण गवळी, गणपत कर्डीले, मच्छींद्र कोरडे, पंढरीनाथ सुडके, पाराजी दिंडे, अजय नजन, नवनाथ तागड यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

या प्रकरणाची संपुर्ण व सखोल चौकशी करून कायदयाचा दुरुपयोग होणार नाही, याची काळजी घेऊ. कोणावरही विनाकारण अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन शेवगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे व पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिल्यानंतर संतप्त समज बांधवांनी आंदोलन मागे घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.