मंगलगेट प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गोवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेचे नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याच्या रागातून शिवसेनेचे पदाधिकारी पोलिस प्रशासनाला दिशाभूल करणारे निवेदन देत आहे. मंगलगेट येथे झालेल्या दहशतीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा पोलिस अधिक्षक रंजन कुमार शर्मा यांना निवेदन देऊन करण्यात आली. 


शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, संजय झिंजे, प्रकाश भागानगरे, फारुक रंगरेज, साहेबान जहागीरदार, हनीफ जरीवाला, अमित खामकर, दिलसारसिंग बीर, जॉय लोखंडे, उमेश क्षीरसागर, राहुल जाधव, संजय खताडे, दिपक लिपाणे, अ­ॅड.वैभव मुनोत, सोमनाथ रोकडे, स्वप्नील ढवण, मतीन ठाकरे, शुभम भंडारी, आशिष डंबाळे, संदीप गुंजाळ उपस्थित होते. 

मंगलगेट येथे कोणी दहशत केली याचे चित्रीकरण राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने यावेळी पोलीस अधीक्षकांना दाखविले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्यास जाधव यांनी पोलिसांना प्रवृत्त केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन, पवन भिंगारे व त्यांच्या नातेवाईकांवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

दरोडेखोराची बाजू चोराने मांडल्यासारखे 
मंगलगेट प्रकरणावरून शिवसेना व राष्ट्रवादी समोरासमोर आली असून, दोन्ही बाजूने एकमेकांवर टिका सुरू झाली आहे. नगरसेवक सचिन जाधव यांच्या पाठिमागे शिवसेनेचे पदाधिकारी खंबीरपणे उभे राहिले आहेत. तर राष्ट्रवादीचे पवन भिंगार यांच्या पाठिशीची राष्ट्रवादीची ताकद आहे. राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेता संपत बारस्कर यांनी यावर टिका केली आहे. सचिन जाधव यांची दिलीप सातपुते यांनी बाजू घेणे म्हणजे दरोडेखोराची बाजू चोराने मांडल्यासारखे आहे, अशी टिका बारस्कर यांनी प्रसिद्ध पत्रक काढून केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.