आता नवीन तरुण चेहऱ्यांना संधी द्या - डॉ. सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गावागावत मंदिरं खूप झाली व सप्ताहाचे प्रमाण फार वाढले आहे त्यास आपला विरोध नाही. मात्र, आता विकास कामासाठी मदत करा, उन्हाळ्यात पाणी टंचाई असते त्यासाठी जलक्रांती योजनेस मदत करा, रस्ते सामाजिक सुविधासाठी आम्ही मदत करू. मात्र, त्यात तुमचीही मदत आवश्यक आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

वाकडी येथील शेळके पंडागळे व पांढरी वस्ती येथील जलतलाव पूजन डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी ते बोलत होते. डॉ. विखे म्हणाले, गावगावातील अंतर्गत राजकीय कलह बंद करा, ज्या गावात सरपंच पद आरक्षित आहे, त्या ठिकाणी उपसरपंच कामकाज पाहतात.

आता नवीन तरुण चेहऱ्यांना संधी द्या तीन ते चार महिन्यात निवडणूक, मध्यवधी निवडणूक लागणार आहे. त्यावेळी तरुणांना सामावून घेणार आहे. तसेच वाकडी गाव लवकरच शिर्डी मतदार संघाशी जोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गावातील कामे करताना ग्रामपंचायत सदस्य व सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे, प्रोसिडिंगवर मिटिंग व चर्चा अगोदर सह्या घेणे बंद करा येथून पुढे ते तपासले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, ज्यांनी आतापर्यंत पदे घेतली, निवडणूक लढवून पदे घेतली त्यांनी आता थांबून घ्यावे. 

आगामी ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात बोलतांना या निवडणुकीत ग्रामस्थांतून सरपंचाची थेट निवड होणार असल्याने कित्येकांना तिकीटासंदर्भात उत्सुकता आहे, पण तिकीट मागण्याअगोदर स्वत:ची चाचपणी करुन घ्या. 'गृहित धरलं एक आणि घडलं एक'असं व्हायला नको. 

जे ज्येष्ठ आहेत त्यांनी थांबून घ्यावे, युवकांना पुढे येवू द्या, असा सल्लाही यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कोणी यावरुन नाराज झाले तर थांबून घ्या, पण कोणीही बेशिस्त किंवा विरोधी कारवाया करत असेल, तर संघटनेत ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संघटनेत पुढील काळात मोठा बदल घडवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.