नैतिक जबाबदारी स्वीकारून जिप अध्यक्ष-उपाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-जिल्हा परिषदेत दोषी अधिकाऱ्यांना वारंवार पाठीशी घालत आल्यामुळेच नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील दुर्घटना घडली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या व निंबोडी येथील दुर्घटनेबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा व उपाध्यक्षा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

वाकचौरे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब कोसळून निष्पाप तीन मुलांचा बळी गेला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्हा परिषदेने बांधकाम केलेल्या इमारतीचे आयुष्यमान किती आहे हा खरा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाने व ग्रामपंचायत इमारतींचे काम करण्यात येते. या सर्व इमारतींचे आयुष्यमान किती आहे हे आता तपासले पाहिजे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडे असलेली थकीत शिक्षण कराची वसुली वेळच्यावेळी करणे आवश्‍यक आहे. आज या सर्व संस्थांकडे 11 कोटी रक्‍कम थकीत आहे. आज ही रक्‍कम मिळाली असती तर मोडकळीस आलेल्या शाळाखोल्याचे बांधकाम या निधीतून करता आले असते. परंतु, शिक्षण विभाग ही रक्‍कम वसुली करण्यास असमर्थ ठरली आहे. 

त्यामुळे याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे. तसेच, निंबोडी दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 5 लाख, तर मयत झालेल्या विद्यार्थ्यांच्या वारसांना 10 लाख रुपये मदत जिल्हा परिषद स्वनिधीतून देण्यात यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.