श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह काल दुपारी १२ च्या सुमारास विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा प्रकार घातपात की अपघात, याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 


काही महिन्यांपूर्वीच श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू येथील अक्षय पानवलकर या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार घडून काही अवधी उलटला असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील मांडवगण (महांडूळवाडी) येथून एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्या लोकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही मुलीचा शोध लागला नाही. यामुळे मुलीच्या घरच्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. 

घटनेनंतर तीन दिवसांनी आज दुपारी १२ च्या सुमारास एका विहिरीत या मुलीचा मृतदेह आढळून आला. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात ठिकाणी आणण्यात आला. या मुलीच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. अनिल भारती हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.