निंबोडीच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा - सत्यजीत तांबे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.नव्याने बांधकाम झालेली इमारत पावसाने कोसळूच कशी शकते ? सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होते हेच यातून सिद्ध होते. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई केली जावी,चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या घटनेची सविस्तर चौकशी करून तात्काळ तत्कालिन संबंधित ठेकेदार,अधिकारी अभियंता यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.


जाहीरात - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

निंबोडी येथे जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये तीन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला तसेच वर्गशिक्षिकांसह इतर १४ विद्यार्थीही जखमी झाले आहेत. सदर घडलेली घटना हि संतप्त करणारी असून शालेय शिक्षणाच्या व्यवस्थेवर विश्वास यानिमित्ताने उडू लागला आहे.यामुळे घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्री तांबे यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची अवस्था दुर्दैवी आहे,अनेक ठिकाणी धोकादायक इमारती, जीर्ण इमारती तसेच अनेक शाळांना छत नसल्याचे समजते.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांचे ऑडिट करून त्याचे पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. निंबोडी येथील घटनेचा बोध घेऊन जिल्हा परिषदेने तात्काळ आपल्या शाळांविषयीचे धोरण बदलणे गरजेचे झाले आहे. भारताचे उद्याचे भविष्य असणारे अशा प्रकारे असुरक्षित करण्याचा कोणालाही अधिकार नाही. 

शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. सरकारी शिक्षण यंत्रणेवरचा जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शाळांकडे, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांना वेळीच दखल घेऊन न्याय देण्यासाठी गाव पातळीवर शाळा व्यवस्थापन समित्यांनी आक्रमक झाले तरच सरकारी शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील असे देखील सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

निंबोडी येथील शाळेचे बांधकाम हे नवीनच असून साधारण १९९९ साली झाल्याचे कळते.इंग्रजांच्या काळातील बांधकामंही अजून उत्कृष्ठ रित्या उभे असतांना नवीन बांधकाम इतक्या लवकर कसे कोसळू शकतात ? सदर बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे झाले आहे, सदर बांधकाम करणारा ठेकेदार दोषी आहे, याची सविस्तर चौकशी करून संबंधित प्रकरणातील शेवटच्या गुन्हेगाराला देखील शिक्षा व्हायला हवी असेही तांबे यांनी सांगितले.

दरम्यान श्री सत्यजीत तांबे यांनी जखमी विद्यार्थ्यांची व शिक्षिका यांची विचारपूस केली व त्यांस जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासित केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.