ठेकेदाराला वाचविण्यासाठी आ.मुरकुटे ग्रामस्थांना पाजत आहेत गढूळ पाणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोन महिन्यांपासून नेवासा शहरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी गढूळ पाणी मिळत आहे. गोरगरीब जनता पाणी उकळून तसेच तुरटी टाकून पीत आहे. या पाणी योजनेचा ठेकेदारासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे सांगून पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. 

फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

खडका, दिघी, मुकुंदपूर, घोगरगाव, बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा, सलाबतपूरसह नेवासा तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. नेवासा वकील संघ, नेवासा युवा सेना, भ्रष्टाचार निर्मुलन समिती, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, कम्युनिस्ट पार्टीसह विविध सामाजिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला. पाचेगाव येथील महिला दारूबंदीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन आल्या होत्या, त्याही या उपोषणात सहभागी झाल्या.

पाहुण्या ठेकेदाराला वाचविण्यासाठी...
पाहुण्या ठेकेदाराला वाचविण्यासाठी आमदार मुरकुटे हे नेवासा शहरातील ग्रामस्थांना गढूळ पाणी पाजत आहे. या ठेकेदाराविरोधात अनेकदा लेखी तक्रार करूनही प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याची तक्रार उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी उपोषणाला बसताना केली.

काही लोकांच्या डोक्यात सत्तेची नशा...
भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल ताके म्हणाले, शहरातील ग्रामस्थांना गढूळ पाणी पाजण्याचे मोठे पाप होत आहे. काही लोकांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली आहे. त्यांना या प्रश्नांची काळजी नसून फक्त नवीन बंगले, नवीन गाड्या व जमिनी घेण्यात यांना रस आहे. पाहुण्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी यासाठी मंत्र्यांची भेट घेणार आहोत..

देखभालीसाठीचा निधी कुठे गेला ? 
नगरसेवक सचिन वडागळे यांनी याबाबत सविस्तर माहिती देतांना सांगितले की, गढूळ पाण्याबाबत आम्ही नगराध्यक्ष यांना कल्पना दिली तसेच संबंधीत अधिकाऱ्यांना ठेकेदारावर कारवाई करण्यची मागणी केली. या पाणी योजनेसाठी दोन कोटी ४७ लाख रुपयांचा फक्त देखभालीसाठी निधी आला हा निधी कुठे गेला? तालुक्याच्या लोकप्रतिनिधी व पाहुणा ठेकेदार यांचे संगनमत असून हा भ्रष्टाचार उघड होवू नये यासाठी प्रशासनावर दबाव टाकला जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या घरावर दंडुका मोर्चा.
नेवासा तालुक्यातील नेवासा शहर, गळनिंब, चांदा, खेडलेसह १७ गावातील पाणी योजनेत फुकटचे श्रेय मिळावे यासाठी आमदारांचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण चालू आहे. याला आमदार जबाबदार असून पुढील आंदोलन हे देवगाव येथे जाऊन लोकप्रतिनिधींच्या घरावर दंडुका मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विश्वास जावळे यांनी दिला

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.