भगवानगडावरील दसरा मेळावा शांततेत पार पडणार .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीक्षेत्र भगवानगड येथील दसरा मेळावा शासन परवानगी देईल त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पंकजा मुंडे यांना मेळाव्याचेनिमंत्रण देण्यासाठी लवकरच कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्याचे पंचायत समिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी सांगितले. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनाही मेळाव्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे.

फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजीत बैठकीला नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, नबाब शेख, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण , गोकुळ दौंड, राम लाड, रणजित बेळगे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, सहदेव शिरसाठ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन पालवे, बाबासाहेब ढाकणे, अर्जुन धायतडक, नगरसेवक प्रसाद आव्हाड , भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, महादेव दहिफळे, नितीन कीर्तने, बाजीराव गिते यावेळी उपस्थित होते.

दर आठवड्याला मेळाव्याबाबत नियोजनाची बैठक होणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत मुंडे व महंतांमधील मतभेद आता संपतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी गडावर राजकीय नेते, पक्षीय नेते आदींना गडावर भाषण बंदी करावी अशी मागणी केली होती. त्याची कठोर अंमलबजावणी झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी विविध मार्गांनी संताप व्यक्‍त करत महंतांच्या निर्णयाविरूध्द नाराजी व्यक्‍त केली होती.

गडाचे महंत निर्णयावर ठाम राहिल्याने मागील वर्षापासून दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला आयोजित करून गड विरूद्ध पंकजा मुंडे असा वाद संपवण्याचा निर्णय तालुक्‍यातील मुंडे समर्थकांनी घेतला. यावर्षी वाद न होता दसरा मेळावा शांततेत पार पडेल, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.