संततधार पावसाने कपाशीचे पीक धोक्‍यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्‍यात दीड महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर गेल्या आठ दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. सलग 28 तास पाऊस पडण्याचा विक्रम झाला. ओढे, नाले सीमा ओलांडून वाहू लागले. तर, शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, आदी पिकांना मोठ्या प्रमाणात झळ बसू लागली आहे.

फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कपाशीची झाडे आपोआप सुकून जात असून, सोयाबीन, तूर पिकांवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. एक-दीड महिन्यापूर्वी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे कपाशी, सोयाबीन पिकांना पाण्याची ओढ बसली. गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांना एकदम भरपूर पाणी मिळाल्याने कपाशीच्या फुलांची गळ होत असून शेतकऱ्यामध्ये चिंता व्यक्‍त होत आहे.

सध्या कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने फवारणीचाही उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत, तसेच शेतात साचलेले पाणी काढून देण्याचे व सुकलेल्या झाडांच्या खोडाला माती लावण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.