चांदा येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील चांदा येथील बसस्थानकामसमोरचे एटीएम फोडून तिजोरी लांबवण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना घडली.चांदा बसस्थानकासमोर तुकाराम चौधरी यांच्या जागेत एटीएम आहे. अनेक ग्राहक या ठिकाणी पैसे काढण्यासाठी येतात. काल सोमवारी सकाळी ६ वाजता चौधरी यांचे लक्ष एटीएमकडे गेले असता एटीएम फुटून तिजोरी बाहेर पडलेली दिसली. लगेच त्यांनी एटीएम कंपनी व पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली.


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

चोरट्यांनी अगोदर प्रवेशद्वारासमोरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरा काढून शेजारीच फेकून दिला. नंतर एटीएम रुमध्ये प्रवेश केला. मशिनच्या वायरी तोडून ते उचलून बाहेर आणले व मशिन फोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. तिजोरीतून किती रक्कम चोरट्यांनी लांबविली, हे समजू शकले नाही. कारण एटीएम कंपनीचे पदाधिकारी इंदोरहून आल्यावरच किती रक्कम गेली, हे समजेल, असे जागा मालकाने सांगितले.

घटनास्थळी तिजोरी पालथी पडलेली होती. पंचनामा रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. चोरी करण्यासाठी चार-पाच चोरटे असावे असा अंदाज आहे. कारण तिजोरीचे वजन सातशे ते आठशे किलो आहे आणि एवढी मोठी तिजोरी उचलण्यासाठी पाच-सहा चोरटे असतील असा नागरिकांचा अंदाज आहे.

तीन महिन्यात एटीएम फोडण्याची चोरट्यांची दुसरी वेळ आहे. लोखंडी पहारीच्या सहाय्याने चोरट्यांनी तिजोरीचा पत्रा अर्धवट काढलेला आहे. एटीएमचे पदाधिकारी आल्यावरच सी.टी.टी.व्ही. फुटेजद्वारेच किती चोरटे होते, याचा शोध पोलिसांमार्फत घेतला जाईल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.