जामखेडच्या उपनगराध्यक्षपदी महेश निमोणकर बिनविरोध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा नगरसेवक महेश निमोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर निमोणकर यांची शहरातून मिरवणूक काढून आंनद साजरा करण्यात आला.


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सोमवार दि.२८ रोजी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, मुख्याधिकारी नितीन कापडणीस, कार्यालयीन अधीक्षक ताकपिरे यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक निमोणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निमोणकर यांना सुचक ऋषिकेश बांबरसे तर अनुमोदक अमित चिंतामणी होते. यावेळी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात, गट नेत्या विद्या राजेश वाव्हळ, वैषाली ज्ञानेश्वर झेंडे, सुरेखा भाऊराव राळेभात,फरिदा आसिफ खान,सुमन अशोक शेळके , राजश्री मोहन पवार, गुलशन अंधारे, शामिरभाई सय्यद, निखील घायतडक,गणेश आजबे पाटील ,दिंगाबर चव्हाण आदी नगरसेवक उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात उपनगराध्यक्षा मेहरूनिसा कुरेशी,नगरसेवक संदीप गायकवाड, लता संदीप गायकवाड, बिभिशण धनवडे, कमल महादेव राळेभात हे अनुपस्थित होते.

उपनगराध्यक्षपदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न करत होते. या पदासाठी शामिर सय्यद,संदीप गायकवाड,अमित चिंतामणी, बिभिशण धनवडे हे देखील इच्छूक होते. परंतु २७ रोजी ना. शिंदे यांनी जामखेडमध्ये शेवटीची बैठक घेवून सर्व नगरसेवकांनी आपण जो उमेदवार द्याल तो मान्य करण्याचे ठरले. शेवटी निमोणकर यांची निवड केली. त्यामुळे इच्छूक असलेले संदीप गायकवाड, बिभिशण धनवडे हे नाराजी दाखवत अनुपस्थित होते.

नवनिवार्चित उपनगराध्यक्ष निमोणकर व महिला बालकल्याण समितीच्या सभापती राजश्री मोहन पवार यांच्या निवडी नंतर त्यांचा नगर परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.