संगमनेर झाले खड्ड्यांचे आणि भटक्या जनावरांचे शहर !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहर सध्या खड्ड्यांचे व भटक्या जनावरांचे शहर झाले आहे. रिमझिम पाऊस सुरु असल्याने शहरात असणाऱ्या उपनगरांमधील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. तर भटक्या जनावरांचाही नागरिकांना व छोट्या-मोठ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेला खड्डे बुजवण्याचा विसर पडला की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संगमनेर तालुक्याची सहकारामुळे राज्यात एक आगळी-वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नगरपालिकेला स्वच्छतेचे विविध पुरस्कारही मिळाले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून कोल्हार-घोटी राज्य मार्गावर असणाऱ्या तीनबत्ती चौक व दिल्ली नाका परिसर, इंदिरानगर, रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक, माळीवाडा, कोष्टी गल्ली, पावबाकी रोड, अकोले नाका, क्रिडा संकुल परिसर आदी ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. 

सध्या रिमझिम पाऊस पडत असल्याने या सर्व खड्डयांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे खड्डेही दिसून येत नाहीत. छोटी-मोठी वाहने चालवतांना वाहनचालक व मोटारसायकलस्वारांना या खड्डयांचा अंदाज येत नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.