आश्वी खुर्द चे माजी सरपंच निवृत्ती गायकवाड यांचे निधन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रगतशिल शेतकरी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत गावचे यशस्वी १९ वर्ष सरपंच म्हणुन काम केलेले निवृती शंकर गायकवाड वय यांचे वृध्दपकाळाने निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले ,सुना, ३ मुली ,जावई , १ भाऊ , भावजयी १ पुतण्या , पुतणी, बहीणी नातवंडे , परतोंडे असा मोठा परिवार आहे. 


आश्वी खुर्द गावच्या विकासात मोठे योगदान देणारे निवृत्ती पा. गायकवाड यांनी सलग १९ वर्ष बिनविरोध सरपंच म्हणुण यशस्वी काम केले पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे विश्वासु सहकारी पदमभुषण बाळासाहेब विखे व राज्याचे विरोधीपक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक म्हणुण ते परिसराला परिचित होते.

आश्वी खुर्द सेवा संस्थेचे चेअरमन, संगमनेर तालुका सहकारी देखरेख संघाचे संचलक, प्रवरा दुध संस्था बाभळेश्वर चे व्हा. चेअरमन , नगर जिल्हा देखरेख संघाचे संचालक, पद्मश्वी विखे पाटील कारखान्याचे संचालक, माऊली पतसंस्थेचे व्हा. चेअरमन म्हणुण यशस्वी काम केले असुन त्यांच्या कार्यकाळात आश्वी खुर्द येथे आठवडे बाजार , प्राथमिक आरोग्य केद्रं , पशुवैदयकीय दवाखाना, इंदिरा आवास योजना , पाणी पुरवठा योजना आदि कामे झाली. येथील प्रवरातिरी अमरधामात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले यावेळी आश्वी खुर्द गावातील व्यवसायिकांनी दुकाने व व्यव्हार व गाव बंद ठेवत श्रद्धांजली वाहिली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.