शेवगावमध्ये सशस्त्र चोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुका व शहरात हत्या व घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच, दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र टोळीस शेवगाव पोलिसांनी रविवारी (दि. २७ ) रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास भगूर गावाच्या पुढील पेट्रोल पंपाजवळ पकडले. या टोळीकडून दोन दुचाकी, एक गावठी कट्टा, एक चाकू, एक तलवार व नायलॉनची दोरी,दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शेवगाव - पाथर्डी रस्त्यावरील भगूर शिवारात पेट्रोल पंपाशेजारी सशस्त्र चोरट्यांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत शिवथरे , पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या परिसरात सापळा लावून या टोळीस शिताफीने पकडले.

या बाबत पोलिस नाईक रवींद्र विलास शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरूद्ध भा. द. वि. कलम ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट कलम ३२५ ए४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीकडून शहरात घडलेले विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पो. नि. सुरेश सपकाळे यांनी वर्तवली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.