येवला-मनमाड रस्त्यावर विचित्र अपघातात १० जण ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :येवला-मनमाड रस्त्यावर एसटीबस, क्रुझर, मारुती व्हॅन व दुचाकी अशा चार वाहनांच्या विचित्र अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू तर पंधराहुन अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे तर मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. येवला तालुक्यातील येवला-मनमाड रस्त्यावरील बाभुळगावजवळ ही दुर्घटना घडली. 

येवला शहरापासून मनमाडच्या दिशेने बाभूळगाव शिवारातील निजधाम आश्रमासमोर रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मनमाडकडून येवल्याकडे येणाऱ्या धुळे-पुणे या एसटी बसला (एम.एच.४०एन.९८२१) पल्सर मोटारसायकल (एम.एच.४१ ए.जे.२४८०) ओव्हरटेक करीत होती. त्याचवेळी येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जाणारी क्रुझर (एमएच.२६ ए.एफ१४८७) जीपच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने क्रुझर जीप पलटी होऊन मारुती ओम्नी व्हॅन (एम.एच.१५ बी.एन. ६४६७) या गाडीवर धडकली. 

क्रुझरचा वेग जास्त असल्याने क्रुझरसह मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला होता. अपघाताची तिव्रता एवढी होती कि अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता तर मृतांचे अवयव विखुरले गेले होते. एसटी बसला किरकोळ नुकसान झाले. जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन येथे वैद्यकिय अधिकारी डॉ.डी.एस.सदावर्ते, डॉ. संजय जाधव, डॉ.किशोर पहिलवान, डॉ.राजेश पटेल यांनी उपचारासाठी मदत केली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.