ऑपरेशन ऑल आऊटद्वारे १८ गुन्हेगारांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हेगारी वस्त्या व गुन्हेगारांचे आश्रय ठिकाणे यांचेवर छापा टाकून १८ संशयीत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना ताब्यात घेतले असून ४९ वारॅटची व १४ समन्सची बजावणी करण्यात आली. तसेच अवैध हातभट्टीच्या ७ ठिकणावर छापे टाकून १९ हजार ३०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील, अपर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शन व सुचनानुसार सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे अधिपत्याखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी करण्यासाठी ऑपरेशन ऑल ऑउट योजना रविवारी (दि.२७) पहाटे २ ते ९ या कालावधीत राबवण्यात आली होती.
शेवगाव उपविभागात पोलिस उपअधिक्षक शिवतारे व पो.नि सपकाळे यांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, चाकु, कोयता व मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

कोपरगाव उप विभागात पोलिस उपअधिक्षक पाटील व पो.नि कडनोर यांच्या पथकाने दरोडयाच्यात तयारीत असलेल्या टोळीतील ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून चाकू, कोयता व तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. तसेच पढेगाव (ता. कोपरगाव) येथे रेकॉर्डवरील आरोपींच्या घरी गेले असतांना त्याच्या कब्जातील एक घातक लोखंडी तलवार मिळून आल्याने त्याच्याविरुध्द आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप वार यांच्या पथकाने पांढरीपूल परीसरात दोन घरफोडी करणारे संशयित काशिनाथ भानुदास बर्डे (वय २३) व असिफ मुनीर शेख (वय २२, दोघे रा. बेलापूर, ता.श्रीरामपूर) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील गेलेला एक लॅपटॉप, ४ मोबाईल हॅण्डसेट, मोबाईलचे ॲक्सेसरी मटेरीअल हस्तगत करण्यात आले.

पाथर्डी पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या पथकाने पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक केली. राहाता पोलिस निरीक्षक कदम यांच्या पथकाने राजणंगाव येथे आरोपीच्या घरी वॉरंट बजावणी कामी गेले असतांना त्यांच्या कब्जातील एक घातक लोखंडी तलवार मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.