थेट सरपंचपदासाठी राजकीय पक्षांना नो एन्ट्री!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याच्या आगामी काळात होणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्यांमधून सरपंच निवडण्याऐवजी थेट मतदारांतून सरपंच निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, पंजा, आदी राजकीय पक्षांचे चिन्हे न वापरता सरपंचपदासाठी निवडणूक लढवावी लागणार असून, गावकऱ्यांना मुक्त चिन्हावरच गावाचा कारभारी निवडून द्यावा लागणार आहे. यामुळे राजकीय पक्षांची चांगलीच गोची होणार आहे.

या उमेदवारांना राजकीय पक्षांसाठी राखीव असलेले चिन्ह घेता येणार नाही. त्यामुळे गावाच्या राजकारणात राजकीय पक्षांना अजिबात स्थान असणार नाही. ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत राज्यातल्या चार हजार १२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN


ऑक्टोबरमध्ये राज्यातल्या १३ जिल्ह्यांमधील ११७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांपासूनच जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. जनतेतून सरपंच निवडण्यासाठी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचाबाबत असलेले संभ्रम दूर करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वप्रथम सरपंचपदाच्या उमेदवारांना मुक्त चिन्हांच्या यादीतील चिन्हांचे वाटप होणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला वाटप करण्यात आलेली मुक्त चिन्हे गोठविण्यात येणार असून, त्या गावातील प्रभागातील उमेदवारांना ते चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे आता गावात सरपंचाचे चिन्ह वेगळे आणि ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वेगळे असणार आहे. 

सरपंचपदाच्या उमेदवारांना वाटप झालेल्या चिन्हानंतर शिल्लक राहिलेली चिन्हे ग्रामपंचायत सदस्यपदाच्या उमेदवारांना वाटप केली जाणार आहेत, असे कळते. विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी थेट सरपंच पदासाठी असलेल्या नव्या नियमांचा अमंलबजावणी होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.