भाजपचे लोण आता संगमनेरपर्यंत पोहोचले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी नगर जिल्ह्यातील अनेक मोठे नेते इच्छुक आहेत. भाजपाचे लोण आता संगमनेरपर्यंत आले आहे; पण त्यासाठी पक्षामध्ये कोणाला घ्यायचे, हे ठरवण्यासाठी पालकमंत्री म्हणून माझी भूमिका महत्वाची असणार आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हणताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.

                               

फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्या हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी ना. शिंदे बोलत होते. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दिलीप साळगट, अशोक भांगरे, कपील पवार, सुभाष आहेर, विश्वनाथ आहेर, शिवाजी धुमाळ, किरण लहामटे, काशिनाथ पावसे आदी उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले, राज्यात काही दिवसात अनेक राजकीय भुकंप होणार आहेत. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत त्यांनी दिले. राज्यातील मोठमोठे नेते भाजपच्या संपर्कात असून त्यांचे लोन नगर जिल्ह्यातही येणार आहे.

कर्जमाफीची घोषणा ही फसवी आहे असे म्हणून विरोधकांनी रान उठवले असले, तरी कर्जमाफीचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला आहे. ज्यांना फायदा झाला नाही, तेच सरकारच्या विरोधात रान उठवत असल्याचा आरोप करून त्यांनी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले, असेही ते म्हणाले. सरकारचे पाऊल हे खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने चालले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.